सांगली : जिल्ह्यात कोणालाही करोनाची लागण नाही, स्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत 97 प्रवासी परदेशवारी करुन आले आहे. त्यांना होम क्वॉरंटाईनबाबत सजग केले आहे. दिवसातून दोन वेळा वैद्यकीय अधिकारी त्यांच्या घरी भेटी देऊन पाठपुरावा करित आहेत. तसेच अशा व्यक्ती घराबाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येत आहे.
आता पर्यंत पाठविण्यात आलेल्या सहा प्रवाशांचे घाशातील स्वॉब तपासणी निगेटिव्ह आली असून काल सायंकाळी निरिक्षणाखाली असलेल्या अन्य दोन प्रवाशांचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संवाद साधला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय सांळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिरीगोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.वालनेस हॉस्पिटल, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यातील सभागृह या दोन ठिकाणी क्वॉरंटाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परदेश प्रवासाहून आलेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपसणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच आठ ठिकाणी आयसोलेशन सेंटरची तजवीज ठेवण्यात आली आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.