शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

"गडखिंडीत रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याच्या ऐतिहासिक घटनेचे शेणोलीजवळ स्मारक व्हावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 1:17 PM

७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.

कडेगाव : स्वातंत्र्यलढ्यावेळी सशस्त्र लढ्यासाठी लागणारा पैसा उभारण्यास येडेमच्छिंद्र- शेणोली दरम्यानच्या गडखिंडीत  रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटण्याची इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अशा घटना आजच्या समस्यांशी झगडण्याची प्रेरणा देतात. या शौर्यशाली इतिहासाची नव्या पिढीला ओळख व्हावी, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानीच्या स्मरण व्हावे म्हणून शेणोलीजवळ रेल्वे लुटीच्या घटनेचे स्मारक व्हावे असे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.७ जून १९४३ रोजी प्रतिसारकरचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, कॅप्टन रामचंद्र लाड क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्यासह १६ क्रांतिकारक सहकाऱ्यांनी रेल्वेने चालेलेला ब्रिटिशांचा शासकीय खजिना लुटला होता.कुंडल तालुका पलूस येथे प्रतिसरकारच्या तुफान दलाचे झुंझार कॅप्टन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर कॅप्टन रामचंद्र लाड यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न झाला. यावेळी  कॅप्टन रामचंद्र लाड जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या हस्ते रोख ५० हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असलेला पुरस्कार साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार अरुण लाड,  जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, व्याख्याते अविनाश भारती, बाळासाहेब पवार, गौरव नायकवडी,लेखिका कॉ.नमिता वायकर उपस्थित होते.यावेळी बोलताना अशोक ढवळे म्हणाले, कुंडल म्हणजे स्वातंत्र्याच्या धगधगत्या क्रांतीपर्वाचा साक्षीदार असलेली क्रांतिभूमी आहे. प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांची ही राजधानीच होती. इंग्रज सरकारच्या विरोधातली अनेक खलबत इथे शिजली. या गावात शिरण्याचं ब्रिटिश पोलीसांच धाडस होत नव्हतं. घराघरात भारतभूमीसाठी लढणारे शूर मावळे ही कुंडलची परंपरा आहे.त्यांचा इतिहास नव्या पिढीसाठी  प्रेरणादायी आहे.असे अशोक ढवळे म्हणाले.यावेळी तासगाव येथील दादोजी कोंडदेव सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  शिस्तबद्ध व शानदार संचलन केले.यावेळी अँड दीपक लाड यांनी स्वागत तर जेष्ठ नेते श्रीकांत लाड यांनी प्रास्ताविक केले.यावेळी "नमन स्वातंत्र्याला या विषयी व्याख्याते अविनाश भारती यांचे व्याख्यान झाले. यावेळी अँड सुभाष पाटील, व्ही वाय पाटील, धनाजी लाड, संताजी लाड, प्रल्हाद पाटील, डॉ.गौरी पाटील, अशोक जाधव, पोपटराव सूर्यवंशी, महादेव लाड, जयवंत आवटे, नितीन गवळी आदी उपस्थित होते. यावेळी किरण पाटील, महेश कोडणीकर आणि शिवाजी रावळ यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Sangliसांगली