शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शहरातील रस्ते कामावरून उपमहापौर-प्रशासनात वाद पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:10 PM

सांगली शहरातील ६४ लाख रुपयांच्या रस्ते कामावरून उपमहापौर धीरज सूर्यवंशी व प्रशासनात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देशहरातील ६४ लाख रुपयांच्या रस्ते कामावरून वाद उपमहापौर-प्रशासनात वाद पेटणार

सांगली : शहरातील ६४ लाख रुपयांच्या रस्ते कामावरून उपमहापौर धीरज सूर्यवंशी व प्रशासनात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

या कामाला मंजुरीचा विषय महासभेसमोर आणला आहे. येत्या दि. २० रोजी होणाऱ्या सभेत त्यावर शिक्कामोर्तब होईल. पण स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही प्रशासनाने या कामाची फाईल अडविली असून, इतर कामांना हाच निकष का लावला गेला नाही, असा प्रश्न उपमहापौरांकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे महासभेत हा विषय चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.उपमहापौर सूर्यवंशी यांच्या प्रभागातील महावीरनगर जैन मंदिर ते कोठारी घर ते जुनी वसंतदादा बँक इमारत, जगवल्लभ पतसंस्था ते साई कॉम्प्लेक्स, जैन बोर्डिंग ते प्रताप टॉकीज या रस्त्याच्या डांबरीकरणाचे ६४ लाखाचे काम होते. या कामासाठी ०.९१ टक्के कमी दराने निविदाही दाखल झाली.

या निविदेला स्थायी समिती सभेनेही मंजुरी दिली. स्थायीच्या दरमान्यतेनंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा होती. प्रशासकीय स्तरावर या कामाची फाईल अडविली गेली. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी फाईल गेल्यानंतर त्यांनी, ५० लाखावरील निर्णयाचे अधिकार महासभेला असल्याचा शेरा मारला. हा विषय मंजुरीसाठी महासभेकडे पाठविण्याची शिफारसही केली.उपमहापौरांनी या विषयाचे विषयपत्र तयार करून ते महासभेकडे दिले. येत्या २० जानेवारी रोजीच्या सभेचा अजेंडा गुरुवारी प्रसिद्ध झाला. यात सूर्यवंशी यांच्या कामाला मान्यता देण्याचा विषय सभेच्या पटलावर घेतला आहे. हा विषय मंजूरही होईल. पण उपमहापौरांच्या कामाला प्रशासनाने लावलेला निकष इतर कामांबाबत का पाळला गेला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी ५० लाखांच्यावरील अनेक विषय स्थायी समितीसमोर आणले. नगरोत्थान योजनेंतर्गत १०० कोटी रुपयांच्या कामांमधील अनेक कामे ५० लाखावरील आहेत. तरीही स्थायी समितीची मंजुरी घेऊन ही कामे सुरू करण्यात आली. मिरजेत १३ कोटी रुपये खर्चून भाजी मंडई उभारण्यात येणार आहे.

सांगलीतील भाजी मंडई नूतनीकरणासह रस्ते काम व अन्य ५० लाखांच्या वरील कोट्यवधी रुपयांचे विषय आहेत. त्यावेळी हा निकष कुठे गेला, असा प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. या रस्ते कामाच्या विषयावरून उपमहापौर व प्रशासनातील वादाला तोंड फुटले आहे. येत्या महासभेत हा विषय वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरSangliसांगली