शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

दिघंचीत बहुरंगी लढत रंगणार

By admin | Published: January 28, 2017 12:16 AM

आरक्षणामुळे प्रस्थापितांची पंचाईत : तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

ंअविनाश बाड ल्ल आटपाडी राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती-जमातीच्या वर्गासाठी आरक्षण पडले आहे. या आरक्षणामुळे भल्याभल्यांची पंचाईत झालेली असताना, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष अशी बहुरंगी लढत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तिकीट मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.या गटात गेल्या जि. प. आणि पं. स. निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. गेल्यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार अनिल बाबर यांचा गट एकत्र होता, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख तेव्हा विरोधात होते. आता राजेंद्रअण्णा आणि हणमंतराव देशमुख एकत्र आहेत, तर बाबर यांचा गट विरोधात गेला आहे. असे असले तरी इथली निवडणूक मात्र चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या सर्व परंपरागत राजकीय गटांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. याच जि. प. गटातून मागील निवडणुकीत निंबवडे पं. स. गणातून भीमराव वाघमारे राष्ट्रवादीतून निवडून आले. नंतर ते उपसभापती झाले. आता आरक्षणामुळे जि. प.साठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे ज्येष्ठ नेते अरुण वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम रणदिवे, शाहीर जयवंत रणदिवे, अतुल जावीर या इच्छुकांची राष्ट्रवादीत चर्चा आहे.शिवसेनेतून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया युवकचे तालुका उपाध्यक्ष आणि राजर्षी शाहू विचार मंचचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे, माजी उपसभापती अण्णासाहेब रणदिवे, संजय वाघमारे, विनोद बनसोडे यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपतून शिवाजी ऐवळे, मंगेश रणदिवे हे इच्छुक आहेत, तर कॉँग्रेसमधून अनिल वाघमारे, उध्दव वाघमारे या इच्छुकांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नवनाथ रणदिवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याकडे आता लक्ष लागले आहे.आरक्षणामुळे पुढाऱ्यांच्या होम मिनिस्टरना संधीदिघंची जि. प. गटातील निंबवडे गणासाठी सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण आहे. त्यामुळे या गटात भाजपमधून जयवंत सरगर, राष्ट्रवादीतून आवळाईचे उपसरपंच गजेंद्र पिसे, शिवसेनेतून गळवेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब गळवे, माजी जि. प. सदस्य जनार्धन झिंबल यांच्या सौभाग्यवतींना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिघंची पं. स. गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रीसाठी राखीव आहे. त्यामुळे या गटातही पुढाऱ्यांच्या होम मिनिस्टरना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे.राजकीय समीकरणांची उलथापालथगेल्या जि. प. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या जयश्री श्रावण वाक्षे यांची उमेदवारी आरक्षणामुळे करगणी जि. प. गटात होण्याची शक्यता आहे, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या जयमाला हणमंतराव देशमुख (४५१९ मते) आता राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेतृत्व गेल्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी केले होते. ते सध्या भाजपचे नेतृत्व करीत आहेत.