शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘ते’ दोन्ही पोलिस निलंबित

By admin | Published: January 19, 2017 12:02 AM

विश्वास नांगरे-पाटील : बडतर्फीसह ‘मोक्का’ची टांगती तलवार

सांगली/कोल्हापूर : पोलिस दलात अंतर्गत कुरघोड्या करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. अंकली (ता. मिरज) व उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी हाणामारी करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल संतोष पाटील व किरण पुजारी या दोघांना निलंबित केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, या दोन पोलिसांवर बडतर्फीबाबत कायद्यातील तरतुदीची तपासणी सुरू असून, ‘मोक्का’अंतर्गतही कारवाईची टांगती तलवार आहे. मोटार पेटविल्याच्या संशयावरून सांगली शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस शिपाई संतोष पाटील व किरण पुजारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. राज्यातील संपूर्ण पोलिस दलात अशाप्रकारे पोलिसांच्यात अंतर्गत कुरघोड्या, वादावादीची खदखद आहे. यासंबंधी आपण काय भूमिका घेणार आहात? या प्रश्नावर नांगरे-पाटील म्हणाले, दोन पोलिसांच्या वादाची ठिणगी भडकून सांगली पोलिस दलातील गटबाजीचे दर्शन झाले, हे खेदजनक आहे. जनतेचे संरक्षण करणारेच हातामध्ये तलवारी घेत असतील, तर गंभीर आहे. पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्यांना कायदा माहीत असतो. त्यांनी कायद्याने तक्रार द्यायची सोडून थेट हाणामारी करून पोलिस खात्याची बदनामी केली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खात्यात ठेवणे घातक आहे. संबंधित प्रकरणाची मी स्वत: माहिती घेतली आहे. सांगलीच्या पोलिस अधीक्षकांना पोलिस कॉन्स्टेबल संतोष पाटील व किरण पुजारी या दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, बुधवारी सायंकाळी सांगलीत पत्रकारांशी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, या दोन पोलिसांनी मारामारीसाठी गुंडांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही गटांतील साथीदारांचे पोलिस रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आल्यास दोन्ही गटांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच या दोन्ही पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कायद्यातील तरतुदीची तपासणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) विशेष क्राईम ब्रँचची नियुक्ती परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये अंतर्गत वादावादी असल्याचे लक्षात आले आहे. ही खदखद कोणाकोणांत आहे, अवैध व्यावसायिक, गुन्हेगारांशी कोणाचे लागेबांधे आहेत, याचा गोपनीय तपास करण्यासाठी ‘विशेष क्राईम ब्रॅँच’ची नियुक्ती केली आहे. हे पथक या पाच जिल्ह्यांतील प्रत्येक पोलिस ठाण्याला भेट देऊन माहिती घेईल. त्यानंतर एक-एक दोषी अधिकारी अथवा कर्मचारी खड्यासारखे शोधून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल.