शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

क्रिप्टोकरन्सीच्या आमिषाने साडे तेरा लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा; सांगलीतील अनेकांना गंडा

By शीतल पाटील | Published: March 28, 2023 7:33 PM

भीमगोंडा पाटील याच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूदारांनी कागदपत्रासह भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली : डॉक्सी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लोकांना दुप्पट लाभाचे आमिष दाखवून १३ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भीमगोंडा ऊर्फ सन्मती कुमगोंडा पाटील (रा. समडोळी, ता. मिरज) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित भीमगोंडा ऊर्फ सन्मती पाटील याने डॉक्सी क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलनामध्ये गुंतवणूक करून दहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्याने जिल्ह्यातील अनेकांकडून पैसे घेतले. त्याबदल्यात गुंतवणुकदारांना त्यांच्या मोबाईलवर डॉक्सी क्रिप्टोकरन्सीचे आयडी आणि डॉक्सी नावचे क्रिप्टोकरन्सी कॉईन दिले. पण त्याने गुंतवणुकदारांना दिलेल्या मुदतीनंतर परतावा दिला नाही. गुंतवणूकदारांनी तगादा लावताच त्याने टोलवा टोलवी केली.गुंतवणूदारांना रक्कम परत न देता त्यांची १३लाख ६० हजार रुपयांना फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पाटील याच्याविरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार अमोल लोहार, विनोद कदम, दीपाली पाटील यांनी ही कारवाई केली. भीमगोंडा पाटील याच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूदारांनी कागदपत्रासह भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी