शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये

By admin | Published: February 19, 2017 12:28 AM

मानसिंगराव नाईक : आरळा येथे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार

शिराळा : शिराळ्यात पक्षाचा, तर वाळव्यात दुसऱ्याच चिन्हाचा प्रचार करणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले.आरळा (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादीचे पणुंब्रे तर्फ वारूण गटाचे उमेदवार शारदा पाटील व मणदूर पंचायत समिती गणाचे उमेदवार पी. वाय. पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख व श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर प्रमुख उपस्थित होते.मानसिंंगराव नाईक म्हणाले की, विरोधक लबाड आहेत. त्यांचे जनतेशी घेणे-देणे नाही. ते फक्त स्वार्थ पाहतात. मंत्रिपदाच्या हव्यासापोटी मतदार संघाच्या विकासाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. स्वार्थाने बरबटलेल्या या मंडळींनी स्वत:च्या संस्थांचा वापर राजकारणासाठी केला. सर्वसामान्य, शेतकरी व कष्टकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या जातीयवादी पक्षाच्या कुटिल अजेंड्यात सहभागी विरोधकांचा दारुण पराभव करा. सत्यजित देशमुख म्हणाले की, स्वार्थापायी जातीयवाद्यांशी हातमिळवणी केलेल्यांचा दारुण पराभव करण्यासाठी जनता सज्ज आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण आहे. पराभव दिसू लागल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते विषारी प्रचार करत आहेत.संचालक शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. हणमंतराव पाटील, बाबालाल मुजावर, पी. वाय. पाटील, शारदा पाटील यांचे मनोगत झाले. यावेळी संभाजी पाटील, सर्जेराव पाटील, सुशीला नांगरे, निलोफर डांगे, एस. वाय. कासार, वसंतराव येसले, बबन भुसारी, कैलास पाटील, यासीन डांगे, पोपट पाटील, हिंंदुराव नांगरे, शब्बीर मुजावर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वेळीच सावध व्हा : भारत पाटणकरडॉ. भारत पाटणकर म्हणाले, जातीयवादी शक्तींचा पाडाव हाच एकमेव अजेंडा सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकरी जनतेने राबवावा. प्रत्येक पुरोगामी विचारसरणीच्या मतदाराने नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्यांना धडा शिकवावा. वेळेत सावध झालो नाही, तर वैचारिक आणि बौद्धिक गुलामगिरी आपल्यावर लादली जाईल.