अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित ६४९० शेती पंपांच्या जोडण्या केवळ ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई केली नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या चार ठेकेदारांना ठेका रद्दच्या नोटिसा पाठविल्या आहेत.
विहिरी, विंधनविहिरी खुदाई करून पाणी लागल्यानंतर शेतकºयांनी रितसर पैसे भरून अर्ज दाखल केले होते. यामध्ये २०१२ ते २०१९ या वर्षातील शेतक-यांचा सहभाग आहे. १०,२३९ शेतकºयांच्या वीज जोडण्यांपैकी महावितरण कंपनीने जिल्ह्यातील दि. ३१ मार्च २०१८ अखेरच्या प्रलंबित ८५९६ वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत (एचव्हीडीएस) १९८ कोटी रुपयांच्या ५६ निविदा मागविल्या होत्या. त्यापैकी २६ निविदांना प्रतिसाद मिळाल्यामुळे १०६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती.
ठेकेदारांना कामे सुरु करण्याचे लेखी आदेश दिले. पण ठेकेदारांकडून कामे सुरु करण्यास अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. मागील दीड वर्षात केवळ दोन हजार १०६ वीज जोडण्यांचीच कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केली नाहीत. यामुळे शेतकºयांनी वीज जोडणीसाठी पैसे भरुनही त्यांची पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत.
शेतक-यांचा वीज जोडणीसाठी दबाव वाढल्यामुळे सध्या महावितरणने जिल्ह्यात काम करणाºया चार ठेकेदारांना, कामे वेळेत पूर्ण न केल्याने ठेका रद्दच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना ठेकेदारांनी वेळेत उत्तरही पाठविले नाही. दि. ३१ मार्च २०१८ पूर्वीच्या जोडण्या प्रलंबित असतानाच सध्या २०१८-१९ या वर्षात ९०२ आणि २०१९-२० या वर्षात ९७४ शेतकºयांनी जोडणीसाठी पैसे भरुन अर्ज केले आहेत.
सध्या महावितरणकडे १०,२३९ जोडण्या प्रलंबित आहेत. एप्रिल २०१२ मध्ये २६७ आणि २०१२-१३ या वर्षात ६१६ शेतकºयांनी अर्ज करुनही त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. आठ वर्षे हे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असून त्यांना महावितरणकडून न्याय मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ठेकेदार आणि अधिकाºयांच्या कारभारावर खासदार, आमदारही गप्प असल्यामुळे वीज जोडणी वेळेत मिळेल का, या चिंतेत शेतकरी आहे.
प्रलंबित : जोडण्या...विभाग शेतकरीइस्लामपूर ६५२कवठेमहांकाळ ४२७०सांगली ग्रामीण २३५६सांगली शहर २३विटा २९३८एकूण १०२३९