जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : हृदयविकार, मेंदू विकाराचा झटका असो वा गंभीर स्वरुपाची शस्त्रक्रिया... रुग्णाला दवाखान्यात दाखल केल्यानंतर ‘पेशंटला आॅक्सिजन लावावा लागेल,’ हे हमखाससांगितलं जातं. अतिदक्षता विभागात तर आॅक्सिजनशिवाय पानही हालत नाही. जिल्ह्यात दररोज आॅक्सिजनच्या सरासरी शंभरहून अधिक सिलिंडरची गरज भासते.उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनचा पुरवठा न झाल्याने तब्बल ६३ जणांचा मृत्यू झाला. ही बातमी प्रसारमाध्यमांमधून समजल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.हा काय प्रकार आहे, आपल्याकडे असे होणार तर नाही ना? ही चर्चा जिल्ह्यातील रुग्णालय परिसरात गाजत आहे. यातून शासकीय यंत्रणेने धडा घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात दोनशेहून अधिक रुग्णालये आहेत. त्यातील तीस ठिकाणी अतिदक्षता विभाग आहेत. सातारा शहरात पाच ते सहा ठिकाणी अतिदक्षता विभाग आहेत.या ठिकाणी दररोज विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होतच असतात. साहजिकच या रुग्णालयांना आॅक्सिजनच्या सिलिंडरची नियमित गरज भासते. सरासरी दहा बेडच्या रुग्णालयात दिवसाला तीन आॅक्सिजन सिलिंडरची गरज भासते.हृदयविकार, मेंदू विकाराचा झटका, कोमात गेलेले रुग्ण तसेच कोणतीही शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या रक्तात आॅक्सिजन मिसळावा, यासाठी आॅक्सिजन लावले जाते. जिल्ह्यात दोन कंपन्या आॅक्सिजनचा पुरवठा करतात. काही वेळेस रात्री उशिराही मागणी आल्यास ते पुरविण्याचे काम कंपन्यांचे कर्मचारी करतात.जिल्ह्यातील वैद्यक क्षेत्रात जंबो सिलिंडर वापरले जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन असतो. तो सरासरी दोन ते पाच लिटर प्रती मिनिट या वेगाने चोवीस तास चालतो. याचा वापर रुग्णांच्या प्रकृतीवर अवलंबून असतो.साताºयात आॅक्सिजनची निर्मिती‘दवाखान्यांमध्ये कायमच आणीबाणीचे प्रसंग उद्भवतात. रात्रीअपरात्री आॅक्सिजनचे सिलिंडर मिळतील, याची खात्री नसते. याचा विचार करून साताºयातील मिनाक्षी हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजन तयार करणारी यंत्रणाच खरेदी केली आहे,’ अशी माहिती डॉ. प्रताप गोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हा शल्यचिकित्सकांचा मोबाईलच आॅक्सिजनवर..गोरखपूर येथील घटना सरकारी रुग्णालयात घडली होती. सातारा जिल्हा रुग्णालयातही दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधींनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, त्यांनी एकही कॉल न घेतल्याने संपर्कबाबत उपलब्ध होऊ शकले नाहीत.
्रजिल्ह्यात हजारो रुग्ण जगतात शेकडो आॅक्सिजन सिलिंडरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:54 PM