शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

सांगली जिल्ह्यात हजारवर वाड्या-वस्त्या तहानलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:07 PM

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच ...

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच उपलब्ध जलस्रोतही आटत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरच्या भरवशावर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये, तर १०७१ वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तापमानातील वाढ अशीच कायम राहिल्यास पाण्याची मागणी अधिक वाढणार आहे.यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. उन्हाळ्याचे चार महिने आव्हानात्मक ठरणार, असेच चित्र त्यावेळी होते. आता मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात वळवाच्या पावसांना सुरुवात होते, तर जूनमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असते. गेल्या तीन वर्षातील पावसाची गती बघितली, तर वळवाचे पाऊस दमदार होत असले तरी संपूर्ण मान्सून अपवाद वगळता कोरडा जात आहे.जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई अधिक जाणवत आहे. म्हैसाळ योजनेतून काही भागात पाणी पोहोचले असले तरी त्याचा संपूर्ण तालुक्याला फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील ८६ गावे व ६५० वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाच्यावतीने तालुक्यात चारा छावणीही सुरू करण्यात येणार आहेत. अगदी हीच स्थिती आटपाडी तालुक्यात असून, टेंभूचे पाणी शिवारात आले असले तरी, टंचाई कायम आहे.तालुका टॅँकर गावे वाड्या बाधित लोक संख्याजत १०३ ८६ ६५० २१५१३०क.महांकाळ १३ १९ ९६ २४२६६तासगाव ११ २२ ९२ २६६८४मिरज ५ ८ १६ २०९१४खानापूर १४ १२ १ १९६१३आटपाडी ३३ २६ २१६ ५०३८१एकूण १७९ १७३ १०७१ ३५६९८८