मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाचा संचालक डाॅ. जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूसह १३ जणांना अटक केली आहे. अॅपेक्समध्ये कमिशनवर रुग्ण आणून गैरप्रकारात सहभागी झाल्याबद्दल अटक केलेल्या सचिन अरुण चांदणे (रा. सांगोला), इनुस इलाही मुजावर (रा. सांगली) आणि वीरेंन उल्हास आवळे (रा. मिरज) हे तीन रुग्णवाहिका चालक कारागृहात असून, त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या तीन रुग्णवाहिका चालकांनी २० ते ३० टक्के कमिशन घेतले असून, डाॅ. जाधव याने तिघांच्या बँक खात्यावर कमिशन जमा केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. संबंधितांच्या तीन रुग्णवाहिकाही पोलिसांनी पुरावा म्हणून जप्त केल्या आहेत. डाॅ. महेश जाधव यास मदत करणाऱ्या सांगलीतील डॉक्टरांच्या अटकपूर्व जामीन अर्जास सत्र न्यायालयात पोलिसांनी विरोध केला. गुरुवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
अॅपेक्स प्रकरणी तीन रुग्णवाहिका चालकांचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:18 AM