शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
3
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
4
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
5
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
6
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
7
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
8
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
10
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
11
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
12
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
13
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
14
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
16
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
17
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
18
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
20
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?

रस्ते हस्तांतरावरून तीन भाऊंमध्ये कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:16 AM

सांगली : जिल्ह्यातील ८ हजार ८५० किलोमीटर लांबीचे रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीचे असून, ५५० किलोमीटरच्या रस्ते दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यावरून सर्वसाधारण सभेत

ठळक मुद्देजिल्हा परिषद सर्वसाधारण सभा वादळी चर्चेनंतर ५५० रस्त्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ८ हजार ८५० किलोमीटर लांबीचे रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीचे असून, ५५० किलोमीटरच्या रस्ते दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यावरून सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, काँग्रेसचे सदस्य सत्यजित देशमुख आणि जितेंद्र पाटील या तीन भाऊंमध्ये कलगीतुरा रंगला. अखेर वादळी चर्चेनंतरही जिल्हा परिषदेकडील ५५० रस्ते हस्तांतरणाचा निर्णय झाला.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत रस्त्यांची दर्जोन्नती केल्याशिवाय निधी मिळणार नसल्याचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. हस्तांतरणाला सत्यजित देशमुख, जितेंद्र पाटील यांनी विरोध केला. जितेंद्र पाटील म्हणाले की, तुमचे सरकार अच्छे दिन आणतो म्हणत आहे. त्यामुळे सरसकट जिल्ह्यातील रस्ते हस्तांतरीत करून अच्छे दिन आल्याचे सांगा.त्यावर अध्यक्ष देशमुख म्हणाले की, सभागृहामध्ये आपण जिल्ह्याच्या विकासावर बोललो तर बरे होईल. या वादावर सत्यजित देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेकडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करून जिल्हा परिषदेचे नुकसान करू नका. यावर संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, जि. प. ला शासनाकडून निधी मिळत आहे. पण तो रस्ते दुरुस्तीसाठी पुरेसा नसल्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्तरावर पाटील, देशमुख यांनी सरसकट रस्ते हस्तांतरित न करता त्यांची लांबी लक्षात घेऊन हस्तांतरित करण्याची सूचना मांडली. याला सदस्यांनी मंजुरी दिल्याने ५५० रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती सुषमा नायकवडी, सुहास बाबर, अभिजित राऊत, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर उपस्थित होते.सर्वसाधारण सभेतून...बोरगाव (ता. तासगाव) येथे डॉक्टर, आरोग्य सेविकेच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावला. या दोषींवर कारवाईची अर्जुन पाटील यांची मागणी.आरोग्य केंद्रातील वाहनांना चालक पुरविणाºया ठेकेदारांची चौकशी करण्याची सदस्य डी. के. पाटील यांची मागणी. त्यानुसार चौकशी करण्याचे अध्यक्षांचे आश्वासनबोरगाव-बावची पाणी पुरवठा योजनेच्या ठरावाचे पुनरावलोकनकृषी विभागाची १ कोटी ३१ लाख रुपयांची कामे मंजुरीविना प्रलंबितजत तालुक्यातील ४ शाळा बंद, ६ शाळांमध्ये शिक्षक नसल्याचा महादेव दुधाळ यांचा आरोपआरोग्य केंद्रातील सोलरच्या चौकशीची मागणीढालगाव आरोग्य केंद्राच्या निविदांचा प्रश्न ऐरणीवरहमीभाव, आॅनलाईनपेक्षा अनुदान द्याउदीड, मूग आणि सोयाबीन हमीभावाने घेण्यासाठी शासनाकडून आॅनलाईन नोंदणी अनिवार्य केली आहे. शेतकºयांच्या सात-बारावर पीकपाण्याची नोंदणी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. दिवाळीच्या तोंडावर शेतकºयांचा माल बाजारातही विक्री होऊ शकत नाही आणि हमीभावाचा लाभही घेता येत नसल्याचे सत्याजित देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांचा माल खरेदी करून घेऊन शासनाने अनुदान द्यावे. सोयाबीनचे ३५ लाख टन उत्पन्न असताना शासनाकडून एक लाख टनाची जबाबदारी घेतली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला.अभिजित राऊत यांचा सत्कारस्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्षांच्याहस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा व पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा सत्कार करण्यात आला. ं