शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

वाळू माफियांच्या खड्ड्यात तीन बालकांचा बळी !

By admin | Published: October 18, 2015 12:24 AM

येरळा नदीतील घटना : संतप्त नागरिकांनी फोडली तहसीलदारांची गाडी

वडूज/औंध : अंबवडे येथील येरळा नदीमध्ये वाळू माफियांनी खणलेल्या खड्ड्यात बहीण भावासह चुलत बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही मुले नदीपात्रात खेळण्यासाठी गेली होती. या प्रकाराला वाळूमाफिया जबाबदार असल्याचा रोष व्यक्त करून संतप्त नागरिकांनी तहसीलदारांची गाडी फोडली. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. स्वप्निल तानाजी पवार (वय ११), स्मिता तानाजी पवार (१३), पूजा देविदास पवार (१२, सर्व रा. अंबवडे, ता. खटाव) अशी बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भूतेश्वर विद्यामंदिर शाळेमध्ये शिकत असलेले पूजा पवार, स्मिता पवार आणि स्वप्नील पवार हे तिघे शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी गेले. त्यानंतर येरळा नदीच्या पात्रात खेळण्यासाठी गेले. सुरुवातीला पूजा नदीत उतरली. तिच्या पाठोपाठ स्वप्निलही गेला; मात्र दोघेही बुडू लागल्याचे लक्षात येताच स्मिताने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली; मात्र तिही त्या खड्ड्यात बुडाली. तुफान दगडफेक.. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र वाळू माफियांविरोधात राग व्यक्त करत संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.