इस्लामपूर : येथील पालिका हद्दीत असणाऱ्या खासगी मिळकतीमधून जाणारा खासगी रस्ता बनावट कागदपत्रे तयार करून तो सार्वजनिक असल्याचे भासविण्यात आले. याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले.
रोहन शिंगणं, भूमी अभिलेखाचे उपअधीक्षक अशोक चव्हाण आणि कर्मचारी अमित बांडे अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध सुनील सुभाष पवार यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांच्या मिळकतीत त्यांच्या मालकीचा खासगी रस्ता आहे; मात्र शिंगणं याने अधिकाऱ्यांशी संगनमत करत बनावट कागदपत्रे तयार करून हा रस्ता सार्वजनिक असल्याचे भासवणारा अहवाल तयार करून घेत पवार यांची फसवणूक केली होती. या अर्जावर सुनावणी होऊन तिघांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.