लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली बाजार समितीचे तीन संचालक भाजपमध्ये जाण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने या संचालकांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली असून, आठवड्याभरात याविषयीचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. प्रवेश करू पाहणाºया संचालकांमध्ये मिरज पूर्व भागातील दोन आणि सांगलीतील एका संचालकाचा समावेश आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांना धोबीपछाड करण्यासाठी काँग्रेसने भाजपमधील काही नाराज नेत्यांना सोबत घेऊन मोट बांधली होती. काँग्रेस आघाडीला सोळापैकी तेरा जागा मिळाल्या होत्या. सुरुवातीचा काही महिन्यांचा अपवाद वगळल्यास, काही संचालकांमध्ये मतभेद सुरु आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडला होता. आॅक्टोबर २0१६ मध्ये सभापती निवडीमध्ये सत्ताधारी गटातील वाद उफाळून आला होता. त्यावेळी सत्ताधाºयांना संजयकाकांची मदत घ्यावी लागली होती. सत्ताधारी संचालक मंडळाने पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याचा चंग बांधला असल्याने, भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न काही संचालकांनी सुरु केला आहे.घोरपडे यांनी जमीन खरेदी प्रकरणाला आव्हान दिले आहे. तसेच संचालकांनी कर्मचाºयांच्या पगाराची रक्कम वाटून घेतली असल्याची तक्रार पणनमंत्र्यांकडे केली आहे. या कारणांनी बाजार समितीत कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. बाजार समितीचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी संजयकाका पाटील यांची मदत घेतली जात आहे. घोरपडे यांचा विरोध मोडून काढण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.पतंगराव कदम-संजयकाका गटाचे सूर जुळलेबाजार समितीत भाजपचा एकही संचालक निवडून आलेला नाही. जे भाजपच्या वाटेवर आहेत, त्यापैकी दोघे विरोधी आघाडीतून, तर एक सत्ताधाºयांच्या मदतीने निवडून आला आहे. तीन संचालकांनी थेट खासदार गटामध्ये प्रवेश करुन काम करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. भविष्यात अजितराव घोरपडेंकडून सत्ताधाºयांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सत्ताधारी कदम गट आणि खासदार गटाने एकमेकांशी सूर जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे.
बाजार समितीचे तीन संचालक भाजपच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:07 AM