कागवाडमधील डॉक्टरसह तिघांना अटकम्हैसाळ भ्रूण हत्याकांड : कर्नाटक कनेक्शन उघड, दोन सोनोग्राफी मशिन जप्तमिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ.बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याच्यासाठी महिलांची गर्भलिंग निदानचाचणी करणाऱ्या कागवाड (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील डॉ. श्रीहरी कृष्णाघोडके (वय ६८), डॉ. खिद्रापुरे याची सहाय्यक सौ. कांचन कुंतिनाथ रोजे(३५, रा. शेडबाळ, ता. अथणी), उमेश जोतिराम साळुंखे (२८, नरवाड) यांनामंगळवारी रात्री अटक करण्यात आली. डॉ. घोडके याच्या रुग्णालयातून दोनसोनोग्राफी मशिन पोलिसांनी जप्त केली. न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसपोलिस कोठडी दिली आहे.मणेराजूरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा डॉ. खिद्रापुरे यानेअनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर म्हैसाळमध्ये डॉ.खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले सर्व १९ भ्रूण सापडले होते. त्यालामंगळवारी अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या डॉ. खिद्रापुरेयाने कर्नाटकातील कागवाड येथील डॉ. श्रीहरी घोडके याच्याकडून गर्भलिंगचाचणी करून म्हैसाळ येथील आपल्या रूग्णालयात गर्भपात करीत असल्याची कबुलीदिली आहे. पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री कागवाड येथे डॉ. घोडके याच्यारुग्णालयावर छापा टाकून तेथील दोन सोनोग्राफी मशिन, रुग्णांच्या नोंदीअसलेली कागदपत्रे ताब्यात घेतली. डॉ. घोडके व त्याचा सहाय्यक उमेशसाळुंखे यांचा गुन्ह्यात सहभाग अढळल्याने त्यांना मंगळवारी रात्री उशिराअटक करण्यात आली आहे. डॉ. खिद्रापुरेला गर्भपातासाठी मदत करणाऱ्या सौ.कांचन रोजे या परिचारिकेसही पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने डॉ. घोडकेसहतिघांनाही दि. १३ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.डॉ. खिद्रापुरे याच्या भ्रूणहत्या रॅकेटचे कर्नाटकातील कनेक्शन उघडकीसआले असून अथणी व जमखंडी येथील आणखी काही डॉक्टरांकडे गर्भलिंग निदानचाचणी करण्यात येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यातसहभागी असलेल्या सांगली, मिरजेतील अन्य काही डॉक्टरांनाही चौकशीसाठीपाचारण करण्यात येणार आहे. डॉ. खिद्रापुरे याच्या रूग्णालयातील कागदपत्रेव संगणकावरील नोंदीवरून पोलिसांनी गर्भपाताच्या गुन्ह्याात मदतकरणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. त्याला स्त्रीभ्रूण हत्येसाठी डॉक्टरपत्नीने मदत केल्याचा संशय असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनीसांगितले. डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले सर्व १९ भ्रूणमुलींचे असल्याचा संशय असून डीएनए तपासणीच्या अहवालाची पोलिसांकडूनप्रतीक्षा सुरू आहे.डॉ. घोडकेकडून गर्भलिंग तपासणीगर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉ. श्रीहरी घोडके यास अटक झाल्याने डॉ.खिद्रापुरे यास मदत करणाऱ्या वैद्यक तज्ज्ञांत खळबळ उडाली आहे. डॉ. घोडकेभूलतज्ञ असून तो कागवाडमध्ये गेली ४० वर्षे रुग्णालय चालवत आहे. गेल्यापाच वर्षापासून त्याने रूग्णांवर उपचार बंद करून सोनोग्राफी मशिनव्दारेगर्भलिंग तपासणी सुरू केली होती. कागवाडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्याडॉ. घोडके याच्यावर चार वर्षापूर्वी छापा टाकण्यात आला होता. मात्रप्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्या अटकेमुळे मिरजेतपोलीस ठाण्याच्या आवारात कागवाडमधील राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी केलीहोती.
कागवाडमधील डॉक्टरसह तिघांना अटक
By admin | Published: March 08, 2017 6:36 PM