संंबंधित शिक्षक १८ मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शालेय सल्लागार समितीची शाळा प्रशासनाने बैठक घेऊन १४ दिवसांसाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला व त्या शिक्षकाच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी घेतली. पहिल्या टप्प्यात ९८, तर दुसऱ्या टप्प्यात ६१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तीन विद्यार्थी, तर एक महिला शिपाई पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील अहवाल प्रलंबित आहेत.
यानंतर बाधित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरातील सदस्यांचीही चाचणी करण्यात आली. यातही एक महिला व एक मुलगा अशा आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. एकूण सात रुग्णांमध्ये एक पुरुष, दोन महिला, दोन मुली व दोन मुलांचा समावेश आहे.
कोट
या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वतीने करण्यात आले आहे.
- डॉ. नंदकुमार खंदारे वैद्यकीय अधिकारी, म्हैसाळ