चैतन्य चव्हाण यांच्या घराच्या शेजारी नातेवाईक गणेश ज्ञानू साठे हे राहतात. मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान शेतातील काम आटोपून सर्वजण घरी आले. यावेळी शेजारच्या मनीषा साठे व कांचन साठे या, शेळीला बांधून घाला असे सांगितल्याने चैतन्य चव्हाण यांच्या आईशी वाद घालत होत्या. वाद वाढत असल्याचे पाहून चैतन्य यांनी वडील दिलीप चव्हाण व भाऊ विक्रम चव्हाण यांना फोन करून घरी बोलावले. दरम्यान, मनीषा यांचा मुलगा समाधानही आला. चैतन्य साठे, शुभम साठे, गणेश साठे, कांचन साठे हेही तिथे आले. त्यांंनी दिलीप चव्हाण, विक्रम चव्हाण व वनीता चव्हाण यांना लाेखंडी सळईने मारहाण केली.
याबाबत तासगाव पाेलीस ठाण्यात नेांद केली असून अधिक तपास सुरू आहे.