शरद जाधव।
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. इतर उपक्रमांबाबत ‘आयएमए’ सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह जाधव यांच्याशी केलेली बातचित .
प्रश्न : ‘आयएमए’ सांगलीच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबविले जात आहेत?उत्तर : नवीन कार्यकारिणीने सूत्रे हाती घेतल्यापासून सामाजिक उपक्रमास नेहमीप्रमाणे प्राधान्य दिले जात आहे. महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली आहेत. यात महिला डॉक्टरांकडूनच उपचार करण्यात आल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढेही समाजातील विविध घटकांसाठी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
प्रश्न : ‘आयएमए’कडून यंदाचा प्रभावी उपक्रम कोणता असणार आहे?उत्तर : आरोग्य तपासणी शिबिरांबरोबरच निसर्ग संवर्धनासाठीही आयएमए पुढाकार घेणार आहे. आमराईतील फुलपाखरू उद्यान देखभालीसाठी आयएमएचे नियोजन असून, याठिकाणी फुलपाखरांसाठी नवीन ३५० झाडांचे रोपण केले जाणार आहे. झाडे लावण्याबरोबरच निसर्ग संवर्धनासाठीही इतर उपक्रम कार्यकारिणीतर्फे राबविण्यात येत आहेत.
प्रश्न : डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत काय वाटते?उत्तर : गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांवर हल्ले वाढत आहेत. यामुळे रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. सध्या हल्ल्याच्या प्रकारामुळे डॉक्टर भयभीत असून, ते मानसिकदृष्ट्या सक्षम असतील तरच रूग्णांवर चांगला उपचार करू शकणार आहेत. रूग्णांच्या नातेवाईकांनी संयम बाळगावा. डॉक्टरांवरील हल्ल्याबरोबरच हॉस्पिटलवर हल्ला करून मालमत्तेचे नुकसान करण्याचेही प्रकार गंभीर आहेत. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनी मानसिकता बदलत डॉक्टरांना सहकार्य करावे.‘आयएमए’ वुमन विंग‘आयएमए’च्या माध्यमातून नेहमीच वैद्यकीय क्षेत्रात व सामाजिक उपक्रमही घेण्यात येतात. यात महिला डॉक्टरांचा सहभाग वाढविण्यासाठी यंदापासून प्रथमच ‘वुमन विंग’ची स्थापना केली आहे. महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करताना या कक्षाची मदत होणार आहे. प्रथमच असा कक्ष स्थापन करून त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे.डॉक्टरांसाठी कायदा समितीडॉक्टरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कायदे माहीत असणे आवश्यक आहे. सध्या रुग्णालयाबाबत शासनाचे वेगवेगळी धोरणे व कायदे येत आहेत. या कायद्यांची डॉक्टरांना माहिती व्हावी या उद्देशाना प्रथमच कायदा समितीची स्थापना करण्यात आली आहे. शासनानेच जैविक कचराविषयक धोरण अथवा हॉस्पिटलविषयक कायद्याची माहिती होणे व त्यात सल्ला मिळण्यासाठी समितीचा उपयोग होतो.
आयएमएच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील उपक्रमांबरोबरच सामाजिक बांधिकली जोपासणीस प्राधान्य दिले जात आहे. - डॉ. रणजितसिंह जाधव