शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अंधार पडताच ती बागेत शिरतात ; त्यांचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू - द्राक्षबागांत वटवाघळांचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 8:49 PM

अंधार पडताच ती बागेत शिरतात. त्यांचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू असतो. खाणे कमी आणि नासधूसच जास्त चालते. फुटलेल्या द्राक्षांचा सडा पडतो. दोन-चार द्राक्षे जरी खाल्ली तरी संपूर्ण घड खराब होऊन तो विक्रीयोग्य राहत नाही.

ठळक मुद्देद्राक्षांवर ताव, , अतिवृष्टीतून बचावलेल्या बागांसमोर नवेच संकट, शेतकऱ्यांची बेदाणा शेडकडे धाव

सांगली : अतिवृष्टीतून बचावलेल्या द्राक्षबागांसमोर आता नवेच संकट उभे ठाकले आहे. पक्व झालेल्या द्राक्षांवर वटवाघळांचे हल्ले सुरू झाले आहेत. संध्याकाळी बहरलेली द्राक्षबाग दुसºयादिवशी सकाळी उद्ध्वस्त झाल्याचे अनुभव येत आहेत. या संकटाने द्राक्षशेतकरी धास्तावला आहे. द्राक्षांच्या विक्रीपर्यंत थांबण्याऐवजी ती बेदाण्यासाठी काढून नेली जात आहेत. त्यामुळे यंदा सुमारे दीड महिना आधीच बेदाण्याचा हंगाम सुरू झाला आहे.शेतकºयांनी अतिवृष्टीतून द्राक्षबागा जिद्दीने बाहेर काढल्या. लाखो रुपये खर्चून द्राक्षे वाचवली. त्यावर आता वटवाघळांचे थैमान सुरू झाले आहे. शेतकºयांसाठी हे संकट अनपेक्षित ठरले आहे. एकावेळी दीड-दोनशेच्या संख्येने येणारी वटवाघळे रात्रभरात एकरातील संपूर्ण बाग उद्ध्वस्त करतात, असे बेडगमधील शेतकरी अनिल खाडे यांनी सांगितले. द्राक्षात साखर उतरली की वटवाघळांना त्याची चाहूल लागते. अंधार पडताच ती बागेत शिरतात. त्यांचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू असतो. खाणे कमी आणि नासधूसच जास्त चालते. फुटलेल्या द्राक्षांचा सडा पडतो. दोन-चार द्राक्षे जरी खाल्ली तरी संपूर्ण घड खराब होऊन तो विक्रीयोग्य राहत नाही.वटवाघळांची चाहूल लागलेल्या काही शेतकºयांनी द्राक्षांची लवकर उतरण करून बेदाणा करणे पसंत केले आहे. पावणेचार महिन्यांची द्राक्षे बेदाण्यासाठी शेडवर दिसू लागली आहेत. एरवी जानेवारीनंतर बेदाण्याचा हंगाम सुरू होतो; पण यंदा हिवाळ््यातच बेदाणा शेड भरू लागली आहेत. पंधरा ते वीस दिवसांत बेदाणा तयार होण्याची अपेक्षा आहे. वातावरणात ऊब नसल्याने औषधांचा वापर जास्त करावा लागणार आहे.-------जाळी आणि प्रखर दिवेवटवाघळांसह अन्य पक्ष्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी शेतकरी बागेवर जाळी लावताहेत, शिवाय रात्रभर प्रखर प्रकाशझोतही सोडावा लागत आहे. निशाचर असणारी वटवाघळे प्रखर प्रकाशामुळे बागेकडे फिरकत नाहीत, द्राक्षांचा बचाव होतो.----------

 

टॅग्स :Farmerशेतकरी