विटा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत सहकारी व सेवाभावी संस्थांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन खानापूर तालुक्याचे सहायक निबंधक युनूस शेख यांनी केले.
विटा येथे जयहिंद को-ऑप. सहकारी सोसायटीच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात गरजूंना सहायक निबंधक युनूस शेख यांच्याहस्ते जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद बाबर, उपाध्यक्ष रमन सुतार, संचालक दयानंद बनसोडे, विक्रम बसागरे उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेच्यावतीने विटा शहरातील मोलमजुरी करणाऱ्या गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संचालक अजित काळभोर यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास संचालक पापा मुल्ला, तात्या माळी, अकलाक शिकलगार, अनंत दिवटे, विजय पवार, सचिव मनोज बाबर, गुरुलिंग जंगम, संजय मेटकरी उपस्थित होते. सचिव मनोज बाबर यांनी आभार मानले.
फोटो : ०५०६२०२१-विटा-मदत वाटप
ओळ : विटा येथे जयहिंद सोसायटीच्यावतीने मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना सहायक निबंधक युनूस शेख यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शरद बाबर, रमण सुतार, दयानंद बनसोडे, पापा मुल्ला यांच्यासह संचालक उपस्थित होते.