तासगाव : कोरोना महामारीच्या काळात दगावलेल्या लोकांमध्ये तंबाखूचे सेवन करणारे लोक तुलनेने जास्त होते, असे दिसून आले आहे, असे मत डॉ. संदीप पाटील यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे आयोजित तंबाखूविरोधी दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
पाटील म्हणाले की, युवकांनी व्यसनापासून दूर राहावे. व्यसनामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते. तंबाखूजन्य घटक ज्या पदार्थांमध्ये वापरले जातात, ते खाल्ल्यामुळे कॅन्सरसारखे भयानक आजार मानवाला होऊ शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम व आवडीचे खेळ याकडे लक्ष द्या.
यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. पी. बी. तेली, डॉ. अजय अंभोरे, डॉ. मेघा पाटील, डॉ. सचिन शिंदे, डॉ. अलका इनामदार, डॉ. अर्जुन कुंभार, डॉ. एस. के. खाडे, डॉ. बी. टी. कणसे उपस्थित होते.