शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

सांगलीत आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन : मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:37 AM

राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी

ठळक मुद्देमेगा भरतीला मराठा समाजाचा विरोध नाही; नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फसवे

सांगली : राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती देऊन मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही फसवे असल्यानेच मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज, मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.त्यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना, राज्य सरकार जाणून-बुजून आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर टाकत आहे. अनेक तरुणही आत्महत्या करू लागल्याने या आंदोलनाने गंभीर रूप घेतले आहे. समाजातील तरुणांना आमचे सांगणे आहे की, आरक्षण हे आपल्या हक्काचे आहे. त्यासाठी कोणीही आपला जीव देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांवरही अनेक संकटे आली; मात्र त्यांनीही धिराने तोंड देत संकटांचा सामना केला.मुख्यमंत्र्यांनी रविवारी मेगा भरतीला स्थगिती देत राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मेगा भरती रद्द करावी अथवा स्थगिती द्यावी, अशी कोणतीही मागणी मराठा समाजाने केली नव्हती. तरीही ही स्थगिती देऊन मुख्यमंत्र्यांनी रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळेच येत्या नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याची त्यांची घोषणाही फसवी असल्यानेच आता तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे.मंगळवारी सांगलीतील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात होईल. सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करावे.यावेळी डॉ. संजय पाटील, विलास देसाई, प्रवीण पाटील, अ‍ॅड. अमित शिंदे, चंद्रकांत डिगे, नानासाहेब कदम, संकेत परब, अनिकेत परब, राहुल पाटील, श्रीरंग पाटील, योगेश पाटील, नाना हलवाई, सौरभ भोसले, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.'मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोणतेही हिंसक आंदोलन करण्यात येणार नाही, असे संयोजकांनी स्पष्ट केले. ठिय्या आंदोलन अहिंसात्मक मार्गाने करण्यात येणार असून, कोणीही सरकारी कार्यालयांची मोडतोड, एसटी बसेसची तोडफोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSangliसांगली