दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : शेतकºयांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने बहुतांश योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र काही ठकसेनांकडून आमिषे दाखवून राजरोस फसवणूक करण्याचे कारनामे सुरूच आहेत. तासगाव तालुक्यात अनुदानित ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. गंडा घातलेल्यांपैकी काहीजण फरार झाले आहेत. अनुदानाच्या मोहात पंचायत समितीचे सदस्यदेखील गुंतले असून, अद्याप या फसवणुकीविरोधात कोणीही अधिकृत तक्रार केलेली नाही.सांगली येथे एक स्वयंसेवी संस्था कागदोपत्री कार्यरत आहे. या संस्थेत काम करणाºया दोन पदाधिकाºयांनी महिला बचत गटाशी संबंधित काम करणाºया तासगाव तालुक्यातील एका महिलेला हाताशी धरून शेतकºयांना गंडवण्याचा उद्योग केला आहे.आळते येथील शेतकºयांना या संस्थेकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळते, असे सांगण्यात आले. शेतकºयांनीही या महिलेवर विश्वास ठेवून सांगली, मिरजेतील संस्थेच्या पदाधिकाºयांना प्रत्येकी ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम दिली. ५ लाख ८७ हजार रुपयांचा मिनी ट्रॅक्टर साडेतीन लाखात मिळणार असल्याचे समाधान शेतकºयांना होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आळतेतील चार, तर लिंंब येथील एका शेतकºयाने पैसे जमा केले. मात्र पंधरा दिवसांत ट्रॅक्टर देण्याची ग्वाही देऊनदेखील ट्रॅक्टर मिळाले नसल्याने शेतकºयांनी तगादा लावला. कुमठे फाटा येथील ट्रॅक्टरच्या शोरूममधून ट्रॅक्टर मिळणार असल्याचे सांगितले होते. त्याठिकाणी जाऊन चौकशी केली; मात्र अद्याप काहीच पैसे भरले नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही तगादा लावल्यानंतर शेतकºयांकडून मिळालेली रक्कम शोरूमला जमा केली. उर्वरित रक्कम शासन अनुदान मिळाल्यानंतर आठ दिवसांत जमा केली जाईल, असे सांगून चार ट्रॅक्टरचे वाटप केले. शोरूमला संबंधित संस्थेकडून उर्वरित रकमेचे धनादेश देण्यात आले होते.आळते येथे ट्रॅक्टर मिळाल्याचे उदाहरण देऊन तालुक्यातील मणेराजुरी, चिंंचणी, लिंंब, आळते, कवठेएकंदसह इतरही काही गावांतील सधन लाभार्थ्यांना गळाला लावण्यात या टोळीने यश मिळविले. त्यासाठी तासगाव पंचायत समितीच्या काही सदस्यांना, कर्मचाºयांना हाताशी धरले. त्यातून लाभार्थी मिळविले. लाभार्थ्याकडून अडीच ते साडेतीन लाख रुपयांपर्यंतची रक्कम गोळा केली आहे. मात्र महिना होऊनदेखील ट्रॅक्टर मिळालेला नाही. त्यामुळे पैसे भरलेल्या शेतकºयांनी तगादा लावला आहे. या तगाद्यानंतर गंडा घालणाºया टोळीने पोबारा केला आहे.फसवणूक झालेल्या शेतकºयांना पैसे मिळतील अशी आशा असल्याने अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही.ट्रॅक्टर मिळाले; पण नावावर नाहीतआळतेतील तीन आणि लिंंब येथील एका शेतकºयाला २४ अश्वशक्तीचे ट्रॅक्टर गंडा घालणाºया संस्थेकडून देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी दिलेले प्रत्येकी साडेतीन लाख रुपये शोरुममध्ये जमा करण्यात आले. उर्वरित रकमेच्या मोबदल्यात संस्थेकडून ११ लाख आणि २० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले होते. मात्र हे धनादेश वठले नाहीत. पूर्ण रक्कम मिळाली नसल्याने ट्रॅक्टर नावावर झाले नाहीत. त्यामुळे उर्वरित रक्कम दिली नाही, तर शोरुम ट्रॅक्टर ओढून नेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पंचायत समितीतील अधिकाºयाचा सहभागपंचायत समितीतील रोजगार हमी विभागातील तांत्रिक सल्लागार असणाºया एका अधिकाºयानेच पंचायत समितीच्या काही सदस्यांना ट्रॅक्टर अनुदानाची योजना सांगितली. त्यानंतर सदस्यांनीदेखील कोणतीही खात्री न करता, शेतकºयांना पैसे भरण्यास प्रवृत्त केले होते. शेतकºयांनी तगादा लावल्यानंतर संबंधित अधिकाºयाने स्वत:चा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश वठला नाही.पंचायत समितीसदस्य तोंडघशीमहिला बचत गटाशी संबंधित काम करणाºया एका महिलेने पंचायत समितीतील कार्यक्रमात, सांगलीतील एका संस्थेच्या माध्यमातून अनुदानावर ट्रॅक्टर दिले जात असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर पंचायत समितीतील दोन सदस्यांनाही भुरळ पडली. त्यांनी काही शेतकºयांना ही योजना सांगून, अडीच ते साडेतीन लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र आता ट्रॅक्टर मिळत नसल्याने हे सदस्य तोंडघशी पडले आहेत.कर्ज काढून भरले पैसेसाडेपाच लाख रुपयांच्या ट्रॅक्टरला दोन लाख रुपयांची सवलत मिळत असल्याची माहिती मिळाल्याने अनेक शेतकºयांनी आर्थिक तरतूद नसतानादेखील कर्ज काढून पैसे भरले आहेत.
ट्रॅक्टरच्या आमिषाने शेतकºयांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:03 AM