शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

वडिलांची सेवा करुन निघाली अन् ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडली, सांगलीतील येवलेवाडीजवळ महिला जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 12:46 PM

सुजाता देसाई यांच्या अपघाती मृत्यूमुळे नवे तांबवे व शिराळा येथे शोककळा पसरली.

रेठरे धरण : येवलेवाडी (ता. वाळवा) येथे ट्रॅक्टर - ट्रॉलीची दुचाकीस धडक बसल्यानंतर ट्रॉलीखाली सापडून पतीसाेबत माहेरहून सासरी निघालेली महिला जागीच ठार झाली. सुजाता विष्णू देसाई (वय ४०, रा. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात घडला.सुजाता देसाई यांचे सासर शिराळा असून, माहेर नवे तांबवे आहे. वडील आनंदा यशवंत धुमाळ हे आजारी असल्याने त्यांची सेवा करण्यासाठी त्या गेला आठवडाभर नवे तांबवे येथे माहेरी राहिल्या होत्या. मंगळवारी रात्री आठ वाजता त्यांचे पती विष्णू देसाई हे शिराळाहून त्यांना न्यायला नवे तांबवे येथे आले होते. जेवण करून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दाेघेही शिराळाला जाण्यासाठी निघाले.घरातून बाहेर पडल्यानंतर दोन - तीन किलोमीटर अंतरावर येवलेवाडी फाट्याच्या पूर्वेस नवे तांबवे ते येवलेवाडी फाटा रस्त्यावर कासेगावकडून नवे तांबवेच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीला त्यांची दुचाकी घासली. अरुंद रस्त्यावर धक्का बसल्याने देसाई यांची दुचाकी घसरली. पाठीमागे बसलेल्या सुजाता या रस्त्यावर पडल्या.याचवेळी त्यांचा उजवा हात ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली सापडला. हाताला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. त्यांना तत्काळ कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.वडिलांची सेवा करण्यासाठी माहेरी गेलेल्या सुजाता देसाई यांच्या अपघातीमृत्यूमुळे नवे तांबवे व शिराळा येथे शोककळा पसरली. सुजाता देसाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू