शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सांगलीतील व्यापाऱ्यांचा अन्न तपासणी अहवालाला विरोध, प्रयोगशाळेसह शुल्क कमी करण्याची मागणी

By शीतल पाटील | Published: March 30, 2023 1:57 PM

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात एकही प्रयोगशाळा नाही

सांगली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पदार्थाची सहामाही तपासणी करून त्याचा अहवाल अपलोड करण्याची सक्ती केली आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. पदार्थाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा नाही. त्यात एनएबीएल प्रयोगशाळेची तपासणी शुल्क अधिक आहे. आधी जिल्ह्यात प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यावी, शुल्क कमी करावेत, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात आली आहे.चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, डेअरी असोसिएशनचे चेतन दडगे, स्वीट असोसिएशनचे नितीन चौगुले, चहा असोसिशनचे राजेश शहा, बेकरीचे नवीद मुजावर, किराणा असोसिएशनचे अरुण दांडेकर, खाद्यतेल असोसिएशनचे सुनील ओस्तवाल यांच्यासह विविध व्यापारी संघटनाच्या प्रतिनिधींनी पत्रकार बैठकीत भूमिका मांडली. ते म्हणाले की, सहामाही तपासणी अहवालाची सक्ती व्यापाऱ्यांना संकटात टाकणारी आहे. प्राधिकरणाने १३ जानेवारी रोजी याबाबतचे आदेश काढले. उत्पादक कंपन्या, रिपॅकर्स आणि रिलेबलर्स यांना पदार्थाची रासायनिक व जैविक तपासणी करून त्याचा अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा लागणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात एकही प्रयोगशाळा नाही. त्यामुळे पुणे येेथे नमुने तपासणीसाठी पाठवावे लागणार आहेत. हे खर्चिक आहे. त्यात स्थानिक प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरला जाणार नाही. जिल्ह्यात ९० टक्के उत्पादक लघु उद्योजक आहेत. त्यांना तपासणीचा खर्च न परवडणारा आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसू शकतो. त्यासाठी चाचण्याच्या किंमती कमी केल्या पाहिजे. शिवाय जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारावी, अशी मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह मंत्री, आमदार, खासदारांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरातून उठाव : शरद शहासहामाही तपासणीची सक्ती रद्द करण्यासाठी व्यापारी संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे. कायद्याला कुणाचाही विरोध नाही. मोठ्या उत्पादक कंपन्यंना कायदा लागू करावा. छोट्या व्यापाऱ्यांना सक्ती करू नये. सर्व उत्पादनाची तपासणीही शक्य नाही. तपासणी खर्चाचा भुर्दंड ग्राहकांनाच बसणार आहे. या कायद्याविरोधात देशभरातून रान उठविण्याची गरज आहे, असे मत चेंबरचे अध्यक्ष शरद शहा यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sangliसांगलीfoodअन्न