आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन व्यापाºयांनी एकी करुन दर पाडून शेतकºयांची लूट सुरु केली आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न करावेत, अशी डाळिंब उत्पादक शेतकºयांनी मागणी केली आहे.
तालुक्यात सध्या युरोपसह परदेशात डाळिंबाची निर्यात करण्यासाठी रसायनमुक्त डाळिंब मोठ्या प्रमाणात उत्पादन केले आहे. अशाप्रकारचे उत्पादन करण्यासाठी शेतकºयांना खूप नियोजन करुन जादा उत्पादन खर्च करावा लागत आहे. पण चांगला दर मिळेल या आशेने शेतकरी मोठा खर्च करीत आहेत. मोठ्या कष्टाने उत्पादन केलेल्या डाळिंबाला दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
डाळिंब पक्व झाल्यानंतर व्यापारी बागेत येऊन शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेऊन खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवितात. ४-६ दिवसानंतर अहवाल सकारात्मक आल्यानंतर मग १५० ते १७५ रुपयांऐवजी ८० ते १२० रुपये प्रतिकिलो या दराने २०० ग्रॅम वजनापेक्षा मोठी डाळिंबे मागतात. शेतकºयाने दुसºया व्यापाºयाला विचारणा केली तर, तो दुसरा व्यापारी पुन्हा शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेतो. पुन्हा डाळिंबे घेऊन प्रयोगशाळेत पाठवितो. पुन्हा ५-६ दिवसांनी बागेत येऊन कमी दराने मागतो. शेतकºयाने दर जास्त मिळावा म्हणून तिसºया व्यापाºयाला विचारले तर तो म्हणतो, पुन्हा डाळिंबाची तपासणी करावी लागेल.
एवढा वेळ जाईपर्यंत फळे पक्व होतात. फळे जादा पक्व झाली तर जमिनीवर गळून पडतात. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने डाळिंब विकून मोकळा होतो. यात व्यापाºयांचा मोठा फायदा होत आहे, तर शेतकºयांची लूट केली जात आहे. यावर मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्याची गरज आहे. यासाठी सतीश वारवकर, चंद्रकांत राऊत, सुधाकर जाधव, नाथा यमगर, राहुल पावले, शिवकुमार साळुंखे, राहुल गायकवाड, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय हजारे, विठ्ठल लिंगडे, किसन चव्हाण, जालिंदर सोन्नूर, काकासाहेब जाधव या शेतकºयांनी बाजार समितीकडे मागणी केली आहे.