शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

व्यापाऱ्यांचे सांगलीत बेमुदत उपोषण सुरू

By admin | Published: December 15, 2014 10:56 PM

एलबीटीला विरोध : ‘बंद’ला महापालिका क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद

सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी)च्या विरोधात सांगलीतील कृती समितीने आजपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाया मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यापाऱ्यांनी केला. या आंदोलनाला पाठिंब्यासाठी पुकारलेल्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. एलबीटी हटावसाठी गेल्या दीड वर्षापासून सांगलीत कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्याभरात महापालिकेनेही एलबीटी वसुलीसाठी कडक पावले उचलत ३० हून अधिक व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. तसेच व्यापाऱ्यांचे दफ्तर तपासणीच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वी कृती समिती व ‘फॅम’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एलबीटी हटविण्याची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी पर्याय मिळेपर्यंत कर भरण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून सांगलीत व्यापाऱ्यांनी एलबीटी हटावसाठी एल्गार पुकारला आहे. सकाळी गणपती मंदिरासमोर व्यापाऱ्यांच्यावतीने आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व व्यापारी सराफकट्टा, कापड पेठमार्गे महापालिकेच्या शाळा क्रमांक एकनजीक जमा झाले. तिथे त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, अनंत चिमड, सुरेश पटेल या चार व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी बोलताना शहा व कोकणे म्हणाले की, एलबीटी हटविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत. त्यांचा एलबीटी व जकात हटावला पाठिंबा आहे. पण राज्यातील २६ महापालिकांतील अधिकारी मात्र व्यापाऱ्यांवर फौजदारी, तसेच बँक खाती सील करण्याची कारवाई करीत आहेत. कोल्हापुरात तीन हजार, परभणीत १२००, तर सोलापुरात साडेतीनशे व्यापाऱ्यांवर फौजदारी केली आहे. एलबीटी हटणार असेल, तर कारवाई कशासाठी सुरू आहे? कारवाई मागे घ्यावी, यासाठी आमचे आंदोलन आहे. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाई थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, हे आदेश निघेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात परभणी व्यापारी संघटनेचे आनंद भाकळे, अतुल शेळके, विक्रम रामसिघानी यांनीही सहभाग घेतला. शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार, तसेच सांगलीतील वैद्यकीय संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मुकेश चावला, सुदर्शन माने, गौरव शेडजी, धीरेन शहा, आप्पा कोरे, प्रसाद कागवाडे, सोनेश बाफना आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)