मिरज : मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर सुमारे ३६ कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे उड्डाण पूलाची उभारणी पूर्ण झाली आहे. रविवारी (दि.१७) या दोन्ही पूलांचे उद्घाटन होणार आहे. मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रेल्वे गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तिष्ठत उभे राहावे लागून वाहतुकीची कोंडी होत होती. पावसाळ्यातही वाहन चालकांना त्रास होत होता. खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे आता मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल बांधल्याने वाहनधारकांना रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबवावे लागणार नाही. भिलवडी रेल्वे स्टेशन नजीक ९० कोटी रुपये खर्च करून रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव खानापूर, आटपाडी तालुक्यादरम्यान रस्ते वाहतूक सुरळीत होणार आहे.यामुळे रेल्वे वाहतुकीसोबत रस्ते वाहतूकही जलद होऊन रेल्वेसाठी वाहनांना खोळंबून राहावे लागणार नाही. सांगली जिल्ह्यात रुपये १२४ कोटी रुपये खर्च करून मिरज व भिलवडी येथे दोन उड्डाणपुल बांधण्यात आले.
Sangli: मिरज, भिलवडी येथील उड्डाणपुलावरून रविवारपासून वाहतूक सुरू
By शरद जाधव | Published: December 15, 2023 5:38 PM