सांगली : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूण तरूणींना स्वत:चा व्यवसाय चालू करता यावा व इतर बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सांगली, केव्हीआयसी, केव्हीआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगभवन सांगली येथे 10 दिवसांचा सामान्य उद्योजकता विकास हा प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच सुरू करण्यात आला.या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक आर. पी. यादव, अग्रणी जिल्हा कार्यालयाचे अधिकारी अनंत बेळगी, आर्थिक साक्षरता केंद्राचे लक्ष्मीकांत कट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थीमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांना प्रेरणा मिळावी तसेच एका कुशल उद्योजकांकडे कोणत्या सक्षमता असाव्यात, बँकेमध्ये व्यवहार कसे करावे, प्रकल्प अहवाल, व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात, विपणन व्यवस्थापन, बाजारपेठ सर्वेक्षणाचे महत्व या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.औरंगाबाद येथे माजी सैनिकांसाठी विविध पदांकरिता भरतीसांगली: औरंगाबाद येथे 136 इन्फंट्री बटालीयन टी.ए.ई.को. महार यांच्याकडून दिनांक 10 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत माजी सैनिक, माजी महिला कर्मचारी एमओईएफ ॲण्ड सीसी, माजी वनरक्षक यांच्यासाठी सोल्जर जी. डी, सोल्जर, सोल्जर ट्रेडमन, कर्ल्क या पदांची भरती केली जाणार आहे.
ही नोकरी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी केले आहे.