गंगाराम पाटीलवारणावती : कर्नाटक स्टेट फॉरेस्ट अकादमीचे सेन्ट्रल इंडिया टूर प्रोग्रॅम अंतर्गत अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेशचे ३४ प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र बामणोली येथे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक नानासाहेब लडकत व उपसंचालक उत्तम सावंत सुचनांप्रमाणे सर्व प्रशिक्षणार्थींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे भौगोलिक व प्रशासकीय रचना, जैवविविधता, जागतिक वारसा म्हणून असलेले महत्व, निसर्ग पर्यटन व्यवस्थापन, लोकसहभाग, मानव वन्यजीव संघर्ष ,जनजागृती आदी विषयांचे सादरीकरण व माहिती वन्यजीव बामणोली वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबणीस यांनी करून दिली.त्यानंतर खिरखिंडी नियतक्षेत्रातील संरक्षण कुटी व निरीक्षण मनोरा येथे क्षेत्र भेटी दरम्यान संरक्षण कुटी वरील कामकाज, विविध रजिस्टर्स गस्ती, वणवा व्यवस्थापन विषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर नियतक्षेत्रात फिरती दरम्यान गस्ती पायवाट देखभाल, कुरण विकास काम, कॅमेरा ट्रॅप , ट्रान्झिट लाईन इ बाबी दाखवण्यात आल्या तसेच माहिती सांगण्यात आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भेटीदरम्यान कुरण विकास, व इतर बाबीविषयी नव्याने माहिती मिळाल्याचे प्रशिक्षणार्थी यांनी अभिप्राय देतेवेळी नमूद केले. यावेळी त्यांच्यासोबत असणारे निदेशक नायक वनक्षेत्रपाल भारत यांनी देखील समाधान व्यक्त केले.
परराज्यातील वनक्षेत्रपालाना सांगली जिल्ह्यातील बामणोलीत प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 6:58 PM