सांगली : जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. बदलीच्या कक्षेत असलेल्या कर्मचाºयांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यात बदल्यांचे ‘गॅझेट’ फुटण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा बदल्यांची प्रक्रिया राबविणार आहेत.
मे महिना सुरू झाला की, अधिकारी व कर्मचाºयांना बदलीची चिंता लागून राहते. १५ जूननंतर शाळा सुरू होतात. तत्पूर्वीच बदली कुठे झाली, हे समजते. त्यादृष्टीने त्यांना मुलांचा शाळा प्रवेश घ्यावा लागतो. तत्पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पार पाडली जाते. मोक्याचे आणि नजीकचे पोलीस ठाणे मिळविण्यासाठी कर्मचारी प्रत्येकवर्षी ‘फिल्डिंग’ लावतात. पोलीस ठाण्यात सहा वर्षे आणि तालुक्यात १२ वर्षे कार्यकाल पूर्ण केलेल्या कर्मचाºयांचे प्रत्येकवर्षी ‘गॅझेट’ फोडले जाते. अधिकाºयांना जिल्ह्यात चार वर्षाचा नियम लागू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काही अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. सध्या बदलीच्या नियमात काही मोजकेच अधिकारी आहेत. गृह विभागाकडून अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. येत्या तीन-चार दिवसात ती सुरू होण्याची शक्यता आहे.
पोलीस शिपाई ते सहायक पोलीस फौजदारांचे प्रत्येकवर्षी ‘गॅझेट’ फोडले जाते. पूर्वी बदलीच्या कक्षेत असलेल्या कर्मचाºयांच्या मुलाखती घेऊन बदली केली जात होती. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी यामध्ये बदल केला आहे. बदलीसाठी अर्ज मागवून घेतले आहेत. गतवर्षीही अशाचप्रकारे शिस्तबद्ध प्रक्रिया पार पडली होती. यावर्षीही कर्मचाºयांनी अर्ज सादर करण्यास प्रारंभ केला आहे. सध्याचे ठिकाण, किती वर्षे सेवा बजावली, उल्लेखनीय काम व कुठे बदली पाहिजे, असा अर्जात उल्लेख करून तो सादर केला जात आहे.जिल्ह्यात ‘खांदेपालट’गृह विभागाकडून पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात नवे अधिकारी दाखल होतील. त्यानंतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील अधिकाºयांचे ‘खांदेपालट’ होण्याची शक्यता आहे. अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने अधिकाºयांचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात किती नवे अधिकारी येतात, त्यावर पुढील प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.