सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सात पोलीस निरीक्षक व सहा उपनिरीक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा बदल्यांचा आदेश जारी केला. बदली झालेल्या अधिकाºयांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, कडेगावचे कल्लाप्पा पुजारी, इस्लामपूरचे विश्वास साळोखे व जतचे अशोक भवड यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली आहे. संजयनगर ठाण्याचे प्रताप पोमण यांची सातारला बदली करण्यात आली आहे. सायबर क्राईम विभागाचे युवराज मोहिते यांची पुणे ग्रामीणला, कवठेमहांकाळचे प्रकाश गायकवाड यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. या सात अधिकाºयांचा जिल्ह्यातील तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक सचिन वसमळे, योगेश पाटील, प्रियांका सराटे, सुजाता पाटील, अजित भोसले व नंदकुमार सोनवलकर यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. हे मूळचे सांगली जिल्ह्यातील असल्याने त्यांची बदली झाली आहे. सोलापूर ग्रामीणहून पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सातारहून चंद्रकांत बेदरे, पुणे ग्रामीणचे पांडुरंग सुतार, कोल्हापूरचे बिपीन हसबनीस यांची सांगलीला बदली झाली आहे. बेदरे यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, तर अन्य तीन अधिकारी मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्या बदल्या केल्या आहेत. सातारहून सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी-इनामदार, संजय हरुगडे यांची, तर पुणे ग्रामीणहून अरविंद काटे यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरहून पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, महादेव जठार, अजित पाटील, रोहिदास पवार, उदय दळवी, गणेश माने व अक्षयकुमार ठिकाणे यांचीही सांगलीत बदली झाली आहे.जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा १३ अधिकाºयांच्या बदल्या झाल्या असल्या तरी, नव्याने जिल्ह्यात १४ अधिकारी दाखल होत आहेत. यामध्ये चार निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक व सात उपनिरीक्षकांचा समावेश आहे.अधिकाºयांचे खांदेपालट होेणार!आता सांगलीत संजयनगर, सांगली ग्रामीण, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, जत व कडेगाव ही पोलीस ठाणी रिक्त झाली आहेत. या सहा ठाण्यात नवीन अधिकाºयांची नियुक्ती करावी लागणार आहे. जिल्ह्यात नव्याने केवळ चारच निरीक्षक दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांतील अधिकाºयांचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:01 PM