सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.आष्टा शहरात वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजातील मान्यवरांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शहरातील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात सर्वांनी सहकार्य केले आहे. प्
रकाश महाजन यांनी आष्टा शहरातील श्री चौंडेश्वरी देवीच्या वज्रलेप विधीपासून विविध धार्मिक कार्यात सहभाग घेऊन प्रवचनाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक, सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचा लौकिक वाढविला आहे.वीरशैव लिंगायत समाजाची आष्टा-मर्दवाडी रस्त्यावर सुमारे दोन एकर जागेत स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत काटेरी झुडपे, झाडे उगवल्यामुळे अंत्यविधीवेळी अडचणी निर्माण होत असत. याबाबत समाजाने बैठक घेऊन, लोकवर्गणी गोळा करून वेळोवेळी स्मशानभूमीची स्वच्छता केली. २००० मध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कूपनलिका खोदण्यात आली. तसेच स्मशानभूमीला दगडी कुंपण बांधण्यात आले.समाज पुढे जात असतानाच या सुसंस्कृत समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश महाजन, विजय कावरे, अनिल महाजन, भालचंद्र कावरे, सुनील सांभारे, श्रीकांत कोरे, सतीश महाजन, केतन महाजन, विवेक महाजन यांच्यासह सर्व समाजबांधव एकत्र आले व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. विवेक महाजन व सहकारी यांनी स्मशानभूमी विकासाचा आराखडा तयार केला.
समाजातील सर्वांना एकत्र करून, या ठिकाणी असलेली पूर्वजांची स्मारके म्हणजेच थडगी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकांना हा निर्णय रुचला नाही. मात्र सर्वांनी सुमारे पाच लाखाच्या दरम्यान मदत केली. परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतल्याने समाजाने या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला.स्मशानभूमीतील दोन एकर जागा स्वच्छ करून सुसज्ज रस्ता करण्यात आला. नांगरट करून जमीन सपाट करण्यात आली. समाजातील सर्व युवकांनी अहोरात्र मेहनत करून चिंच व शतावरीची रोपे लावली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा फूलझाडांसह वड, पिंपळ, उंबर, लिंब, चाफा यासह विविध प्रकारची झाडे लावली.यावेळी श्री ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, डॉ. एन. डी. सांगले, दौलत थोटे, संजय लोखंडे, महेश गुरव, संतोष जोशी, डॉ. निशिकांत महाजन, निखिल खुडे, पोपट माळी, केरू शिंदे, सत्तू ढोले उपस्थित होते. या झाडांना ठिबक सिंचनच्या माध्यमातून नियमितपणे पाणी देऊन या उपक्रमात सातत्य कायम ठेवले आहे.