महिला समाजसुधारकांच्या विचारांची, कार्याची स्मृती जोपासणे व पर्यावरण संरक्षण यासारखे उपक्रम राबवून महापालिकेच्या बेघर केंद्राने आदर्श निर्माण केल्याचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी बेघरांना निवारा देऊन महापालिकेने कर्तव्यभावनेने सन्मान व त्यांचे पुनर्वसन केल्याचे सांगितले. केंद्र व्यवस्थापन समिती व केंद्र संचालिका यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. प्रकल्प व्यवस्थापिका ज्योती सरवदे यांनी प्रस्ताविक व केंद्र संचालिका सुरेखा शेख यांनी स्वागत केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई, विलास सोनवणे, प्रकाश लोटे, ॲड. पूजा शिंदे, अशोक झेंडे, गोपाळ पवार, कवी बन्सीलाल कदम, नागनाथ माने, गोपाळ पवार, दत्तात्रय बन्ने, सागर देवरूखकर, धनाजी कदम, रेखा पवार, शांता मोरे, हसीना दिलावर, हिराबाई माने, रेशमा शाहीद, फुलाबाई मुखंडे, हसीना भाजीवाली, धनंजय शिंदे, महंमद खाटीक, स्नेहल सुतार, अश्विनी रूपनर, प्रतीक्षा काळे उपस्थित होते. यावेळी स्त्री-पुरुष समतेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. ज्योती सराेदे यांनी आभार मानले.
मिरजेत महिला समाजसुधारकांच्या नावे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:28 AM