वाळवा : येथील क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या शतकमहोत्सवी जयंती प्रारंभ दिनी हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळी कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अण्णा आणि कुसुमताई नायकवडी यांच्या स्मारकस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
इथेनॉल प्लांट परिसरात ११ आंबा व नारळ रोपांचे वैभव नायकवडी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तर संकुलाच्या विविध परिसरात १०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हुतात्मा साखर कारखाना उपाध्यक्ष बाबूराव बोरगांवकर, दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, बझार अध्यक्ष दिनकर बाबर, बँक अध्यक्ष किरण नायकवडी, जिल्हा परिषद सदस्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, माजी मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, आर. डी. पाटील, शिराळा पंचायत समितीचे उपसभापती प्रा. बाळासाहेब नायकवडी, तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदू पाटील, अभियंता वसंत वाजे, हुतात्मा विद्यालय मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या चेंडके, स्नेहल गौरव नायकवडी, नंदिनी वैभव नायकवडी, आटपाडी पाणी परिषदेचे करंजे येथील माने गुरुजी, किसान नंबर तीन सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सावकर कदम उपस्थित होते.