शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

मिरज-कागवाड मार्गावर झाडांची खुलेआम कत्तल, वाढलेल्या फांद्या सोडून थेट खोडावरच कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 1:27 PM

झाडे कोणाच्या आदेशानुसार काढली यांची चर्चा

सुशांत घोरपडेम्हैसाळ : मिरज-कागवाड या राज्य महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्ताच्या वाढलेल्या फांद्या काढणे अपेक्षित असताना संपूर्ण झाडाचीच कत्तल केली आहे. अनेक झाडे काढून टाकळी आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ताच्या कडेला झाडेच नसल्याने ही झाडे कोणाच्या आदेशानुसार काढली यांची चर्चा सुरू आहे.मिरज-कागवाड राज्य महामार्गावर कागवाड ते मिरज प्रवास करताना अनेक ठिकाणी रस्ताच्या दुतर्फा मोठ्या झाडाच्या फांद्या वाहनधारकांसाठी धोक्याच्या ठरत आहेत. एखादी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांच्यात भीतीचे वातावरण आहे.मिरज-कागवाड हा कर्नाटकात जाणारा मुख्य माग आहे. या महामार्गावरून दररोज हजारो वाहनाची वाहतूक सुरू असते. या रस्ताच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठी झाडे आहेत. झाडाच्या फांद्या अडव्या-तिडव्या वाढून रस्त्यावर मध्यभागी आल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा जोराचा वारा सुटल्यावर एखादी फांदी रस्त्यावरच पडते. पावसाळ्यात तर प्रत्येक वर्षी किमान दोन ते तीन वेळा पावसाने व सुटलेल्या वाऱ्याने झाडे व फांद्या उन्मळून पडतात. अशावेळी वाहतूक ठप्प होते. तेव्हा वाहनधारकांना तासगाव फाटा, विजयनगर मार्गे किवा म्हैसाळ येथील जुना रस्ता या मार्गावरून प्रवास करावा लागतो.यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना या फांद्यांचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरील अनेक ठिकाणी झाडाच्या वाढलेल्या फांद्या काढून टाकणे गरजेचे असताना संबंधित विभागाने संपूर्ण झाडेच काढून टाकली आहेत. नेमके कोणाच्या आदेशानुसार ही झाडे तोडली ही चर्चा वाहनधारकांच्यात सुरू आहे. म्हैसाळ मधील अनेकांचा याचा अनुभव आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष्य देऊन झाडाच्या वाढलेल्या फांद्या ताबडतोब काढाव्यात अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

मिरज-कागवाड या राज्य महामार्गावरून आम्ही दररोज प्रवास करतो. रस्त्याच्या मध्य भागापर्यंत झाडांच्या फांद्या आल्या आहेत. वारा आल्यानंतर किवा फांद्या वाळून रस्त्यावर पडतात. रस्ता रहदारीच्या असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - प्रमोद कोळी वाहनधारक म्हैसाळ

टॅग्स :Sangliसांगली