गतवेळच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर दोन्ही पक्षांच्या युतीचे तसेच बंडखोरांचे आव्हान असणार आहे. सतरा जागांसाठी सुमारे एकशे सात अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी ५४ जणांनी अर्ज माघारी घेतले, तर या निवडणुकीसाठी एकूण १७ जागांसाठी ५३ जण निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी निवडणुकीसाठी सोशल मीडियासह, प्रचार यंत्रणा राबविली आहे.
चाैकट
प्रचारास प्रवेश बंदीच्या फलकाची चर्चा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ग्रामस्थांनी, ‘सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मत मागण्यासाठी येऊ नये. स्वतःचा व मतदारांचा वेळ वाया घालवू नये.’ अशा गावपुढाऱ्यांना टोला लगावणाऱ्या लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा आहे. कोरोना पार्श्वभूमीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.