पलूस : पलूसचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजाराम सदामते यांच्या निधनानंतर मंगळवारी पालिकेत शोकसभा झाली. सर्व नगरसेवकांनी लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
शोकसभेत गटनेते सुहास पुदाले म्हणाले, राजाराम सदामते यांच्या जाण्याने समाजकारण, राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न निघणारी आहे. नव्याने झालेल्या पालिकेत त्यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, पलूसच्या सर्वांगीण विकासाच्या अनेक योजनांत हिरिरीने सहभाग घेतला. दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांना ते गुरुस्थानी मनात होते. डॉ. विश्वजित कदम यांचे ते कट्टर समर्थक होते.
या शोकसभेला के. डी. कांबळे, संदीप सिसाळ, अमर इनामदार, जगदीश पाटील, अशोक मोरे, विशाल दळवी, संजय गोंदील, गिरीश गोंदिल, परशुराम शिंदे, राहुल सदामते, मुख्याधिकारी सुमित जाधव व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
100821\1916-img-20210810-wa0022.jpg
शोकसभा फोटो