शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

रावसाहेब दादांनी जैन समाजाची प्रतिष्ठा वाढविली - भालचंद्र पाटील 

By अशोक डोंबाळे | Published: June 28, 2024 5:01 PM

सांगलीत दक्षिण भारत जैन सभेतर्फे रावसाहेब (दादा) पाटील यांना श्रध्दांजली

सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब (दादा) पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जैन समाजाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली. दादांनी समाजाला दाखवलेली दिशा आणि त्यांच्या विचारावर आपण मार्गक्रमण करून समाजाची प्रतिष्ठा अबाधित राखणे, समाजासाठी त्यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने सांगलीत आयोजित श्रध्दांजली सभेत भालचंद्र पाटील बोलत होते.चेअरमन रावसाहेब जि. पाटील म्हणाले, दादांनी परिणामांची चिंता न करता समाजहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. स्तवनिधी व हुबळी बोर्डिंगचा प्रश्न, शिष्यवृत्ती निधीमधील वाढ, सभा व शाखांचे आर्थिक स्थैर्य, सभेचे सांगलीतील शताद्बी त्रैवार्षिक अधिवेशन हे त्यांच्यामुळेच शक्य झाले. दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले.उपाध्यक्ष दत्ता डोर्ले म्हणाले, हुबळी बोर्डिंगच्या वैभवामागे दादांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. सभा ही काही लोकांची न राहता ती सर्वांची असल्याचे दादांनी कृतीतून दाखवून दिले. खजिनदार संजय शेटे म्हणाले, सभेला दादांच्या रूपाने एक कणखर नेतृत्व लाभले. दादा पुढील दहा वर्षाचे नियोजन करीत आणि त्यासाठी ठोस पावले उचलत. सहखजिनदार अरविंद मजलेकर म्हणाले, लहान-थोर सर्वांना हवहवंस वाटणारे असे दादांचे व्यक्तिमत्त्व होते. समाजातल्या सर्व प्रश्नांची जाण त्यांना होती. ॲड. विजयकुमार सकळे म्हणाले, दादा फक्त जैन समाजाचे नव्हते तर बहुजन समाजाशी त्यांची घट्ट नाळ जोडली होती.सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, ऋतुराज पाटील, महामंत्री दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, राजेंद्र झेले, महिला महामंत्री कमल मिणचे, पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्रा. ए. ए. मुडलगी, सेक्रेटरी प्रा. आप्पासोा मासुले, वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, इचलकरंजी बोर्डिंगचे सेक्रेटरी बी. बी. हुपरे, ॲड. कुबेर शेडबाळे, कळंत्रे श्राविकाश्रमच्या अध्यक्ष अनिता पाटील, अरूण पाटील, जैन बोर्डिंगचे अध्यक्ष प्रा. राहुल चौगुले, डॉ. चंद्रकांत चौगुले, डॉ. अशोक नाईक, डॉ. जयपाल चौगुले, श्रीपाल चौगुले आदीनी श्रध्दांजली वाहिली. शेवटी णमोकार महामंत्राने श्रध्दांजली सभेची सांगता झाली. श्रध्दांजली सभेस दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, इचलकरंजी आदि सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली