खरसुंडी : घरनिकी (ता. आटपाडी) येथील आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती उस्मान नबी शेख यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. रक्षाविसर्जनप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
आ. अनिल बाबर म्हणाले, उस्मान शेख हे माझे मार्गदर्शक व राजकीय गुरू होते. त्यांच्या जाण्याने
तालुक्याच्या विकासाची तळमळ असणारे नेतृत्व हरपले.
विशाल पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील यांचे खंदे समर्थक असणाऱ्या शेख यांनी आयुष्यभर समाजसेवेची भूमिका घेऊन आपल्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
तानाजी पाटील, रावसाहेब पाटील, दा. नी. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डी. एम. पाटील, टी. के. वाघमोरे, आनंदराव पाटील, विजय पाटील, शिवाजी येळे, विजय सावकार, सुरेश पाटील, हैबत पाव्हणे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.