शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

शिराळ्याच्या ‘त्रिमूर्ती’मुळे राजकीय दबदबा कायम

By admin | Published: June 04, 2016 12:18 AM

आणखी एक आमदार पद : आता मंत्रिपदाकडे नजरा

विकास शहा ल्ल शिराळाशिराळा विधानसभा मतदारसंघाचा राजकीय दबदबा पुन्हा एकदा दिसून आला आहे. या मतदारसंघास एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन-तीन आमदार मिळाले आहेत. याअगोदर तीन ‘शिवाजीराव’ आमदार होते, तर आता ‘दोन शिवाजीराव व एक सदाभाऊ’ आमदार झाले आहेत.या मतदारसंघाचा पहिल्यापासूनच राजकीय क्षेत्रात राज्याच्या राजकारणावर दबदबा आहे. शिवाजीराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदांची, विधान परिषदेच्या सभापतिपदाची तसेच प्रदेश काँग्रेसची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन अबाधित आहे. आजही ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी राज्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वी पार पाडली आहे. आता भाजपमध्ये तसेच जिल्ह्याच्या राजकारणातही अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. संभाव्य राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांचे नाव अग्रस्थानावर आहे. हे दोन शिवाजीराव आमदार आहेतच, याचबरोबर या मतदारसंघातील येलूरचे शिक्षक नेते शिवाजीराव पाटील हेही विधानपरिषदेवर आमदार होते. एकाच वेळी या मतदारसंघात तीन ‘शिवाजीराव’ आमदार होते. शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आमदार झाले. ते मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील असले तरी शिराळा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघास पुन्हा तीन आमदार मिळाले आहेत. या मतदारसंघाने राजकीय दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. सध्या आमदार शिवाजीराव नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.