कासेगाव : राष्ट्रीय महामार्गालगत मालखेडजवळ कासेगाव हद्दीत थांबलेल्या पोलिसांच्या वाहनास ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. कासेगाव पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कासेगावलगत (ता. वाळवा) असणाऱ्या मालखेड फाट्यानजीक मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कासेगाव पोलीस ठाण्याची जीप (एमएच १० एन ०६३४) रात्रीच्या गस्तीसाठी थांबलेली होती. यावेळी कऱ्हाडहुन कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या ट्रक (केए १८ सी ५५९५)ने पाठीमागून पोलीस गाडीला जोराची धडक दिली. यामध्ये पोलीस कर्मचारी बाळासाहेब जयसिंग मंडले (वय ५०), सुनील आकाराम पाटील (५४) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कासेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे अधिक तपास करीत आहेत.
फोटो : २३१२२०२०-आयएसएलएम-कासेगाव क्राईन न्यूज
ओळ : कासेगाव (ता. वाळवा) येथे मालट्रकने धडक दिल्यानंतर पोलिसांची जीप उलटली.