इस्लामपूर : कोरोनाच्या महामारीत खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. कोरोनाच्या काळात महिलांनी पूर्ण घराची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे खऱ्या कोरोना योद्धा या महिलाच आहेत, असे प्रतिपादन हर्षदा राहुल महाडिक यांनी केले.
आष्टा (ता. वाळवा ) येथे हळदी-कुंकू समारंभ व महिलांचा स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी स्नेहल गौरव नायकवडी, भाग्यश्री वैभव शिंदे, मोहिनी सागर खोत, अनिता कपिल ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाडिक म्हणाल्या, घरची लक्ष्मी ही त्या घरातील महिला असते. त्यामुळे महिलांना सन्मानाने वागविले पाहिजे. कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांनी लघु, घरगुती उद्योग सुरू करणे गरजेचे आहे.
यावेळी आष्टा शहरात कोरोनाकाळात उल्लेखनीय काम केलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. भाजप जिल्हा चिटणीस लता पडळकर यांनी संयोजन केले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी,उपनगराध्यक्षा प्रतिभाताई पेटारे, नगरसेविका मनीषा जाधव, पुष्पलता माळी, संगीता सूर्यवंशी, मंगल सिद्ध, वर्षा अवघडे, रुक्मिणी अवघडे, अनुराधा झंवर, डॉ. सोनाली कुरणे, संगीता खोत, प्राजक्ता थोरात, अपर्णा महाजन, मनीषा कोरे, अनिता सूर्यवंशी, दीपाली पाटील,वैष्णवी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.
फोटो - १२०२२०२१-आयएसएलएम- आष्टा न्यूज
आष्टा (ता. वाळवा) येथे कार्यक्रमात हर्षदा महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्नेहल नायकवडी, भाग्यश्री शिंदे, मोहिनी खोत, अनिता ओसवाल उपस्थित होत्या.