कवठेमहांकाळ : गावच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य जाईल. गाव पातळीवर वाद-विवाद न करता विकासाच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचा आणि गावाचा विकास करा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी केले.
नगरपंचायतीच्या नाट्यगृहात तालुक्यातील राष्ट्रवादीतर्फे कवठेमहांकाळ तालुक्यातील सरपंच, उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश पाटील बोलत होते.
म्हैसाळ (एम)चे सरपंच शहाजी एडके, उपसरपंच रोहिणी पाटील, तिसंगीच्या सरपंच रोहिणी सावळे, उपसरपंच सिंधूताई पोळ, इरळीचे उपसरपंच आबासाहेब खांडेकर, बनेवाडीच्या सरपंच वैशाली माळी, नागोळेच्या सरपंच छायाताई कोळेकर, रायवाडीचे सरपंच विश्वनाथ दुधाळ, उपसरपंच विश्वास साबळे, जांभूळवाडीच्या सरपंच सुजाता दाईंगडे, उपसरपंच चंद्राबाई सरक यांचा सत्कार झाला.
महांकाली कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे म्हणाल्या, गावपातळीवर निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी गावच्या विकासासाठी एकत्र राहून विकासाचा आलेख उंचवावा आणि गावाचे नाव मोठे करावे.
युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, चंद्रकांत लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष संजय हजारे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे दत्ताजीराव पाटील, ताजुद्दीन तांबोळी, विश्वास पाटील, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, मोहन खोत, महेश पाटील, टी. व्ही. पाटील, महेश पवार, गजानन कोठावळे, माजी सभापती एम. के. पाटील, पंचायत समितीचे उपसभापती नीलम पवार, महेश पाटील, संजय कोळी, धनाजी जाधव, मीनाक्षी माने, कुमार पाटील, वामन कदम, अल्लाबक्ष मुल्ला, मोहन खोत उपस्थित होते. माजी सभापती सुरेखा कोळेकर यांनी आभार मानले.