शिराळा : डोंगरी तालुका असूनही वीज मंडळाचे अधिकारी, कर्मचारी लोकांची कामे वेळेत करीत नाहीत. लोकांची चेष्टा करताय काय? असा सवाल करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आमदार शिवाजीराव नाईक यांची वीज वितरण अधिकाऱ्यांना दम भरला. आज झालेल्या ऊर्जामित्र बैठकीत ते बोलत होते. आमदार नाईक म्हणाले, येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शेतीपंपाचे कनेक्शन नसतानाही वीज बिले येत आहेत. त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. मणदूर, चरण, टाकवे येथे नवीन फिडर बसविण्यात यावेत. आवश्यक त्या ठिकाणास गावठाणातून कनेक्शन्स द्यावीत. अंत्री, पाडळेवाडी येथील लोकांचे कनेक्शनच्या नावाखाली पैसे घेतलेल्या ठेकेदाराची चौकशी करावी. तालुक्यातील डिपॉझिट भरूनही कनेक्शन न दिलेल्यांची चौकशी करावी. शिवणी धरणातील बोगस ट्रान्स्फॉर्मरची चौकशी करावी, अशा सूचना करीत, हे अधिकारी नियमानुसार कनेक्शन न देता आर्थिक तडजोडी करत आहेत. त्यांची खात्यामार्फत चौकशी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.यावेळी शिरसी शाखा अभियंता रामदास शेळके यांच्या कारभारावर लोकांचा रोष असल्याच्या कारणावरून आमदार नाईक यांनी, तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढू, असा दम देत,कामात सुधारणा न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची समज दिली. यावेळी मागील प्रकरणातील १७ प्रकरणे मार्गी लागल्याचे सांगून या बैठकीत ५७ अर्जाची दखल घेत ती वितरण विभागाकडे पाठविण्यात आली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, कार्यकारी अभियंता यु. एस. शेख, उपकार्यकारी अभियंता सपाटे, पाटणकर, सु. वा. कोकणे, संचालक आनंदराव पाटील, संचालक अरूण सोनटक्के, बाळासाहेब नायकवडी, डॉ. इंद्रजित यमगर, कनिष्ठ अभियंता शिराळा, च. बी. जाधव, सहायक अभियंता कोकरूड, शि. वा. देशमाने कनिष्ठ अभियंता आरळा, कु. एस.एस. गुंजले, सहायक अभियंता शा. का. पेठ, आर. वाय माने, शा. का. चिखली, वाय. व्ही. मालवणकर कनिष्ठ अभियंता नेर्ले, डी. एस. काठाळे कनिष्ठ अभियंता वाटेगाव, सी. आर. बेंद्रे सहायक अभियंता कासेगाव, एस. एस. गायकवाड कनिष्ठ अभियंता चिकुर्डे, जी. एम. गलांडे कनिष्ठ अभियंता ऐतवडे बु., एम. एच. रसाळ कनिष्ठ अभियंता तांदुळवाडी, डॉ. एम. सी. पाटील, गजानन पाटील, सुरेश पाटील, भारत निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)महावितरण विरोधात तक्रारीमहावितरण कंपनीच्या शिराळा तालुक्यातील कारभाराविषयी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही तक्रारी झाल्या होत्या. याबाबत त्यांनी दोषी अधिकाऱ्यांनी कारभारात सुधारणा करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महिन्याभरापूर्वी सांगलीत दिला होता. तरीही महावितरण अधिकाऱ्यांच्या कारभारात सुधाारणा होत नसेल तर कडक धोरण स्वीकारावे लागेल, असा इशाराही नाईक यांनी दिला.
आमचाही वीज पुरवठा बंद करा
By admin | Published: June 03, 2016 12:15 AM