फोटो ०१ मिलिंद हुजरे
फोटो ०१ शंकर स्वामी
फोटो ०१ अनुश्री विसपुते
फोटो ०१ विनित लुगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बारावीच्या गुणदानाविषयी महाविद्यालयीन स्तरावरील गोंधळ अजूनही संपलेला नाही. गुणदानाविषयी शासनाकडून अद्याप निश्चित मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. सीबीएसईने गुणदानाचा पॅटर्न निश्चित केला असला तरी राज्य बोर्डाने मात्र अंतिम निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे महाविद्यालये अजूनही संभ्रमात आहेत.
शासनाने कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी आनंदीत झाले असले तरी महाविद्यालये मात्र पेचात सापडली आहेत. सीबीएसई बोर्डाने गुणदानाचा पॅटर्न निश्चित केला आहे. दहावी, अकरावी आणि बारावीच्या मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्याचे गुण निश्चित केले जातील. राज्य बोर्डानेही हाच पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्या निश्चित मार्गदर्शक सूचना महाविद्यालयांना अद्याप मिळालेल्या नाहीत. दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांचा संयोग साधून बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करायचे आहे; पण गेल्या वर्षी अकरावीची परीक्षा झालेली नसल्याने पेच निर्माण झाला आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षाही झालेली नाही. ऑनलाइन परीक्षा आणि विद्यार्थ्यांचा वर्षभराच्या अभ्यासाला मिळालेला प्रतिसाद याच्या आधारेच त्याचे गुण महाविद्यालयांना निश्चित करावे लागतील. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
अकरावीच्या परीक्षेविना गुण कसे?
- बारावीचे गुणदान निश्चित करताना अकरावीच्या २५ टक्के गुणांचा संदर्भ घ्यायचा आहे; पण गेल्या वर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने पेच आहे.
- कोरोनामुळे अकरावीतून विद्यार्थी बारावीमध्ये वर्गोन्नत झाले आहेत, त्यांचे गुणांकन कसे करणार? हा मोठा प्रश्न महाविद्यालयांपुढे आहे.
बॉक्स
बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?
- दहावीला अंतर्गत स्वरूपाचे २० गुण मिळतात, बारावीला मात्र तशी सोय नसते. मग मूल्यांकनात अंतर्गत गुण कसे द्यायचे, असा गोंधळ शिक्षकांपुढे आहे.
- विद्यार्थ्यांचा वर्षभराचा परफॉर्मन्स पाहून अंतर्गत गुण द्यायचे? झाले तरी ते किती द्यायचे? याचाही खुलासा किंवा मार्गदर्शन राज्य बोर्डाने अद्याप केलेले नाही.
बॉक्स
बारावीसाठी असे होणार गुणदान
- नववी, दहावी आणि अकरावीतील गुणांच्या आधारे बारावीचे गुण निश्चित करावेत, असे शासनाचे धोरण विचारात आहे; पण गतवर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने संभ्रम आहे. काही महाविद्यालयांनी वर्षभर ऑनलाइन स्वरूपात चाचणी परीक्षा घेतल्या आहेत. त्याच्या आधारे विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येत आहेत.
पॉईंटर्स
बारावीतील विद्यार्थी ३४,६६१
कला १०,८५९, विज्ञान १७,४३०, वाणिज्य ५,०६८
बॉक्स
अकरावी म्हणजे रेस्ट ईयर
- अनेक विद्यार्थी अकरावीचे वर्ष म्हणजे निवांत या भावनेत असतात. अभ्यास केला नाही तरी बारावी गाठता येते, असा आत्मविश्वास असतो.
- या निवांत विद्यार्थ्यांपुढे आता धर्मसंकट आहे. अकरावीचे वर्ष टाइमपास करत काढल्याने परफॉर्मन्स दाखवता आलेला नाही, त्यामुळे बारावीचे गुणांकन कमी होण्याची भीती आहे.
शासनाने लवकर निर्णय जाहीर करावा,
बारावीच्या गुणांकनाविषयी निश्चित सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. आम्ही महाविद्यालयीन स्तरावर वर्षभर अंतर्गत परीक्षा घेतल्या होत्या, त्याच्या आधारे विद्यार्थ्यांचे गुणदान करत आहोत.
- डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य, वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव.
बारावी परीक्षेच्या गुणांकनाविषयी शासनाने अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. शासनाकडून मार्गदर्शनाची आम्हाला प्रतीक्षा आहे. सूचना येतील त्यानुसार विद्यार्थ्यांची गुणनिश्चिती केली जाईल.
- प्रा. शंकर स्वामी, प्राचार्य, बी. एस. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सलगरे.
कोट
मूल्यमापनासाठीच्या पारंपरिक परीक्षा पद्धतीची जागा यंदा ऑनलाइन परीक्षेने घेतली. प्रथमदर्शी त्याचा फायदा होताना दिसत असला तरी ही परीक्षा मूल्यमापनासाठी योग्य नाही. शासन या स्थितीत सुवर्णमध्य साधत ३०-३०-४० या प्रकारे मूल्यमापनाच्या विचारात आहे. सध्या तरी ते योग्यच माानावे लागेल.
अनुश्री विसपुते, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.
कोविडमुळे परीक्षा घेता येत नाहीत; पण दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे बारावीचे मूल्यमापन ही अयोग्य पद्धती आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हानीकारक आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नियोजन करावे. परीक्षेविना निकाल योग्य नाही.
विनित लुगडे, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली.