शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

चोवीस गावे हागणदारीमुक्त

By admin | Published: October 13, 2015 10:15 PM

तासगाव पंचायत समिती : १७ हजार कुटुंबे शौचालयाशिवाय

दत्ता पाटील-- तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे तालुक्यातील तब्बल २४ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. चार महिन्यांत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ९९४ कुटुंबांना शौचालय उभारणीसाठी १ कोटी १९ लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. तालुक्यात शौचालय नसलेली अद्यापही १७ हजार ४०९ कुुटुंबे आहेत.गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तासगाव तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवले. गावन्गाव पिंजून काढले. शौचालयाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवली. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्याला १२ हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्याची सोय केली. त्यामुळे चार महिन्यांत ९९४ कुटुंबांनी शौचालय बांधून एक कोटीच्यावर अनुदान घेतले. या विशेष मोहिमेमुळे तालुक्यातील २४ गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत. तालुक्यातील अन्य गावांचा पंचायत समितीमार्फत सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार इतर गावांत अद्याप १७ हजार ४०९ कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नाही. या कुटुंबांनीही शौचालय बांधावेत, यासाठी पंचायत समितीकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.तालुक्यातील ३९ गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. यापैकी बहुतांश गावांत हागणदारीमुक्तीची फज्जा ऊडालेला आहे. निवडणुकीसाठी सध्या या गावांत शहकाटशह, कुरघोडीचे राजकारण जोरात सुरु आहे. मात्र या निवडणुकीत हागणदारीमुक्तीचा अजेंडा जाहीरनाम्यात दिसून येत नाही. त्यामुळे गावकारभाऱ्यांची ऊदासीनताही हागणदारीमुक्तीला अडसर ठरत असल्याचे चित्र आहे.पदाधिकाऱ्यांची उदासीनता तालुक्यातील ६९ गावांपैकी २४ गावे हागणदारीमुक्त झाली असली, तरी इतर गावांत हागणदारीची मोठी समस्या आहे. या गावात शौचालयांचा प्रश्न मार्गी लागल्यास, तालुका हागणदारीमुक्त होणार आहे. मात्र पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांचे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. शासनाचा निधी आपल्याच विभागात मिळावा, यासाठी अट्टाहास धरणारे सदस्य हागणदारीमुक्तीसाठी उदासीन असल्याचे दिसून येते.हागणदारीमुक्त झालेली गावे लोढे, गोटेवाडी, कचरेवाडी, मतकुणकी, बिरणवाडी, नागेवाडी, वाघापूर, भैरववाडी, डोर्ली, पानमळेवाडी, विजयनगर, लोकरेवाडी, ढवळी, लिंंब, मोराळे (पेड), बेंद्री, किंदरवाडी, धोंडेवाडी, नरसेवाडी, यमगरवाडी, योगेवाडी, आरवडे, शिरगाव (क.), यमगरवाडी.