दिलीप मोहिते- विटा -शेती पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी यापुढील काळात ठिबक सिंचनाचा वापर करण्याची शेतकऱ्यांवर शासन सक्ती असताना खानापूर व कडेगाव तालुक्यातील १ हजारहून अधिक हेक्टरवरील ठिबकच्या अनुदानाचे १ हजार ६६१ प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकले आहेत. या प्रस्तावाचे सुमारे दोन कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही दुष्काळी बळिराजाच्या पदरात पडले नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षातील रकमेसाठी गेल्या दोन वर्षापासून ठिबकचे शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत.दुष्काळी भागात शेती पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर शेती पिके घेण्यासाठी पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. त्यासाठी ठिबक सिंचनसारखे पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाले. दुष्काळी भागातील शेतकरी जास्तीत जास्त ठिबक सिंचनाकडे आकर्षित व्हावा, यासाठी राज्य शासनाने ठिबकला अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ६० टक्के, तर दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याची भूमिका शासनाने घेतली.खानापूर व कडेगाव तालुका कृषी विभागाकडे दाखल झालेल्या प्रस्तावाची माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सुरू असल्याचे अधिकारी सांगत असले, तरी दुष्काळी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम कधी मिळणार, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे ठिबकच्या अनुदानाचे प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकल्याने दुष्काळी बळिराजापुढे अनुदान रकमेच्या प्रतीक्षेशिवाय पर्याय उरला नाही. २०१३-१४ या वर्षातील म्हणजे गेल्या दोन वर्षापूर्वीचे ठिबकचे उर्वरित सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी पसरली आहे. यापार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना तातडीने ठिबकचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.५सुमारे १ हजार हेक्टरवर ठिबकखानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जैन, नेटाफीम, ईपीसी, फिनोलेक्स यासह अन्य ठिबक कंपनीच्या माध्यमातून २०१३-१४ या आर्थिक वर्षात ४९९ हेक्टर १७ आर क्षेत्रावर ठिबक केले. त्याचे ७६१ प्रस्ताव तालुका कृषी विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्याचे अनुदान १ कोटी ३६ लाख रुपयांपर्यंत होते. त्यातील १५० प्रस्तावांचे २६ लाख अनुदान विटा कृषी विभागाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते, तर कडेगाव तालुक्यातही सुमारे पाचशे हेक्टरवर याचवर्षी ठिबक करण्यात आले. त्याचे अंदाजे ९०० प्रस्ताव तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी दाखल केले. या प्रस्तावाचे अनुदान सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत आहे. त्यातील ७० प्रस्तावासाठीचे १० लाख अनुदान कडेगाव तालुका कृषी विभागाला प्राप्त झाल्याचे समजते. मात्र, २०१३-१४ या वर्षातील म्हणजे गेल्या दोन वर्षापूर्वीचे ठिबकचे उर्वरित सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. खानापूर तालुक्यात २०१३-१४ या वर्षी ठिबक सिंचन व स्प््िरांकलरचे सुमारे ४९९ हेक्टर १७ आरवरील ७६१ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावाची आॅनलाईन माहिती भरण्याचे काम सुरू आहे. तालुका कृषी विभागाला २६ लाख रुपये प्राप्त झाले असून, त्या रकमेतून १५० प्रस्तावाचे अनुदान देणे शक्य होईल. उर्वरित ६११ प्रस्तावांची माहिती शासनाला आॅनलाईन दिल्यानंतर उर्वरित अंदाजे १ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.- सी. पी. डुबलतालुका कृषी अधिकारी, विटाकडेगाव तालुक्यात २०१३-१४ च्या ठिबक सिंचनासाठीचे प्राप्त झालेल्या ९०० प्रस्तावांचे आॅनलाईन फिडिंग सुरू आहे. २०१४-१५ चे चालू वर्षातील प्रस्तावाची माहिती आॅनलाईन भरून शासनाला सादर केली आहे. फक्त गेल्यावर्षीची म्हणजे २०१३-१४ च्या प्रस्तावाची माहिती शासनाला मिळाल्यानंतर कडेगाव तालुक्याचे सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांना आणखी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागेल.- एन. टी. पिंजारीतालुका कृषी अधिकारी, कडेगाव
‘ठिबक’चे अडीच कोटी अनुदान थकित
By admin | Published: June 16, 2015 11:17 PM