शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

Sangli: पोलिस असल्याचे सांगून तीन राज्यात लूट, दोघा भामट्यांना अटक; ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Published: February 23, 2024 12:22 PM

आंतरराज्य गुन्हेगार मिर्झाकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

सांगली : महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरात राज्यात पोलिस असल्याचे सांगून वृद्धांना लुटणाऱ्या कंबर रहीम मिर्झा (वय ३७, रा. कॉलेज रोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर ) आणि जफर मुक्तार शेख (वय ३३, रा. सुभेदार वस्ती, श्रीरामपूर ) याला मिरजेतील वृद्ध डॉक्टरला लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांकडून ५ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.मिरजेतील डॉ. रणजीतसिंग रामसिंग सुल्ह्यान (रा. छत्रपती शिवाजी रस्ता) हे दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घराजवळ असताना संशयित कंबर मिर्झा व जफर शेख यांनी पोलिस असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची साखळी फसवून काढून घेतली. त्यानंतर दोघे पसार झाले. डॉ. सुल्ह्यान यांनी महात्मा गांधी चाैक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करत असताना सोनसाखळी लंपास करून पलायन केलेले दोघे कोल्हापूरहून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी बुधवार दि. २१ रोजी अंकली कॉर्नरजवळ सापळा लावला होता. त्यावेळी दोघेजण एमएच १७ पासिंगच्या दुचाकीवरून येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली. त्यांची झडती घेतली. त्यावेळी संशयित मिर्झाकडे सोन्याची साखळी आणि रोख रक्कम सापडली. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही दोन दिवसांपूर्वी पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची कबुली दिली.

गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार, पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलिस कर्मचारी सागर लवटे, बिरोबा नरळे, दऱ्याप्पा बंडगर, संदीप गुरव, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, अमर नरळे, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने केली.कंबर मिर्झा आंतरराज्य गुन्हेगारकंबर मिर्झा हा पोलिस दप्तरी गुन्हे नोंद असलेला गुन्हेगार आहे. त्याने पोलिस असल्याचे भासवून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात गुन्हे केले आहे. आंतरराज्य गुन्हेगार मिर्झाकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याला गांधी चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस